आज ‘काश्मिरी हिंदू बलीदानदिन’ आहे. त्या निमित्ताने…
‘१९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, ती पहिली घटना नव्हती. त्याची पाळेमुळे १४ व्या शतकात रूजली आहेत. तेव्हापासून काश्मिरी हिंदू प्रचंड अत्याचार सहन करत आहेत.
गेली ३ दशके काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हद्दपार करण्यात आले आणि येथील हिंदु समुदायाचा जिहाद्यांनी नरसंहार केला, याची अद्यापही भारत सरकारने अधिकृतपणे नोंद घेतलेली नाही. (हे आतापर्यंतच्या सर्व सरकारांना अत्यंत लज्जास्पद ! – संपादक) स्वतःच्या मातृभूमीत आपली संस्कृती, वारसा आणि अधिकार यांना असणारा वाढता धोका, यांमुळे हद्दपार झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या पुढच्या पिढीला त्रास सहन करावा लागत आहे. १९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, ती पहिली घटना नव्हती. त्याची पाळेमुळे १४ व्या शतकात रूजली आहेत. तेव्हापासून काश्मिरी हिंदू प्रचंड अत्याचार सहन करत आहेत. प्राध्यापक एल्. भान यांच्या ‘पॅरेडाईज लॉस्ट’ या पुस्तकात काश्मिरी हिंदू हे काश्मीर सोडून गेल्याच्या ७ घटनांचा उल्लेख पुढीलप्रमाणे आहे.
१. वर्ष १३८९ ते १४१३ या कालावधीत सर्वप्रथम काश्मिरी हिंदूंना सामूहिकरित्या करावे लागले स्थलांतर ! : १४ व्या शतकात सय्यद मीर अली हमदानी याने त्याच्या ७०० अनुयायांसह काश्मीरमध्ये प्रवेश केल्यानंतर काश्मीर खोर्यात अस्वस्थता निर्माण झाली. हमदानी याने काश्मीरमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या मुसलमानांच्या मनात हिंदूंविषयी द्वेष निर्माण केला आणि सुलतान कुतूबुद्दीन शाह याला काश्मिरी हिंदूंच्या छळ करण्यासाठी प्रभावित केले. त्यामुळे जे हिंदू धर्मांतर करण्यास नकार देत, त्यांचा छळ केला जात होता.
पुढे सुलतान सिकंदर (बटशिकन) शाह याने हिंदूंची मंदिरे अपवित्र करणे, देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे आणि हिंसाचार करून काश्मिरी हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करणे यांद्वारे काश्मीरमध्ये दहशत निर्माण केली. यामुळे काश्मिरी हिंदूंनी १३८९ ते १४१३ या कालावधीत सामूहिकरित्या स्थलांतर केले. काश्मिरी हिंदूंना स्थलांतर करावे लागल्याची ही पहिली घटना होती.
२. वर्ष १५०६ ते १५८५ या कालावधीत दुसर्यांदा करावे लागले स्थलांतर ! : शाह मीर याच्या सैन्यातील तुकडीत असलेल्या चाक्स याच्यामुळे १५०६ ते १५८५ या कालावधीत काश्मिरी हिंदूंना स्थलांतर करावे लागल्याची दुसरी घटना घडली. चाक्स हा इस्लामच्या शिया पंथातील होता. त्याचे ‘हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करणे, त्यांची मालमत्ता लुटणे, जाळपोळ करणे आणि हिंदूंच्या हत्या करणे’, हे धोरण होते. चाक्स याने हिंदूंची अनेक श्रद्धास्थाने नामशेष केली. त्याने काश्मीरमधून देवाची पूजा करण्याविषयीच्या सर्व खुणा पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळे काश्मिरी हिंदूंनी काश्मीर खोर्यातून पलायन केले. जे राहिले, त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले गेले अन् ज्यांनी नकार दिला, त्यांना ठार मारण्यात आले.
३. १५८५ ते १७५३ या कालावधीत तिसरे स्थलांतर ! : त्यानंतर जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब यांचा काळ हा काश्मिरी हिंदूंसाठी अतिशय वाईट होता. अकबराने काश्मिरी हिंदूंना पुनर्स्थापित केल्याचे सांगितले जाते; परंतु त्याचे वारस हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत असहिष्णु होते. विशेषतः औरंगजेब याचे संपूर्ण भारताचे इस्लामीकरण करण्याचे ध्येय होते आणि विशेषत: त्याने काश्मिरी हिंदूंना लक्ष्य केले. त्याने हिंदूंवर ‘झिजिया कर’ लादला आणि ‘धर्मांतराची प्रकिया करण्यास हिंदु विद्वानांमुळे विलंब होतो’, असा ठपका ठेऊन काश्मीरमधील हिंदु विद्वानांना संपवले. त्यामुळे वर्ष १५८५ ते १७५३ या कालावधीत काश्मीरमधील हिंदूंनी तिसर्यांदा स्थलांतर करून ते देहलीला गेले.
४. १७५३ ते १८१९ या कालावधीत चौथे आणि पाचवे स्थलांतर ! : या कालावधीत अफगाण राजाच्या दुष्ट अत्याचारांना कंटाळून काश्मिरी हिंदूंनी चौथ्या वेळी स्थलांतर केले. अमिर खान जवांशीर या शिया मुसलमानाने स्वतःला ‘काश्मीरचा राज्यपाल’, असे घोषित करून मिर फजल कांथ याला मुख्यमंत्री बनवले. त्याच्या राजवटीत त्याने हिंदूंना लुटून हिंदूंच्या क्रूर हत्या केल्या. अफगाणी आक्रमणकर्त्यांची क्रूरता आणि सैतानी छळ यांमुळे काश्मिरी हिंदू निर्वासित म्हणून पूंछ अन् काबूल येथे गेले.
त्यानंतर वर्ष १८८६ मध्ये गुलशहा याच्या राजवटीत काश्मिरी हिंदूंना पाचव्यांदा काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागले.
५. ब्रिटीश आणि मुसलमान यांच्या अभद्र युतीकडून हिंदूंचे सहाव्यांदा विस्थापन ! : ब्रिटिशांच्या राजवटीत तरुण काश्मिरी मुसलमान पदवीधरांनी ‘मुस्लिम रिडिंग रूम’ पक्ष स्थापन केला. त्या वेळी राज्य प्रशासनामध्ये वेगवेगळ्या पदांवर असलेल्या काश्मिरी हिंदूंचा ते द्वेष करत होते. वर्ष १९३१ मध्ये ब्रिटीश सरकारच्या पाठिंब्याने या पक्षाने हिंदूंच्या मालमत्तेची लूट करायला आणि काश्मिरी हिंदूंच्या हत्या करायला आरंभ केला. शेख अब्दुल्ला याने महाराजा हरिसिंग यांच्या विरोधात हिंदूविरोधी मोहीम चालू केली. त्याने मुसलमानांना चिथावणी दिल्याने १३ जुलै १९३१ या दिवशी मुसलमानांकडून काश्मिरी हिंदूंवर भीषण अत्याचार करण्यात आले. मुसलमानांच्या सशस्त्र टोळ्यांनी हिंसाचार करून प्रचंड अराजक निर्माण केल्याने पुन्हा एकदा वर्ष १९४८ मध्ये काश्मिरी हिंदूंनी पलायन केले.
(क्रमशः सोमवारच्या दैनिकात)
– शेहजार कौल, संयुक्त सचिव, ‘यूथ फॉर पनून कश्मीर’