ब्रह्मगिरी पर्वतावरील अनधिकृत कामाविषयी जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल मागवणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आमदार छगन भुजबळ यांनी ब्रह्मगिरी पर्वतावरील अनधिकृत कामाविषयीचे सूत्र लक्षवेधी सूचनेच्या वेळी सभागृहात उपस्थित केले होते. 

सोलापूरमधील गोवंश हत्येविषयी होणार उच्चस्तरीय चौकशी !

‘सोलापूर एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या पशूवधगृहाने बांधकामाची अनुमती घेतली आहे का ? प्रदूषण नियंत्रणाविषयीचे नियम पाळले जात आहेत का ? तसेच गोवंशांची हत्या होत आहे का ? याविषयी उच्चस्तरीय चौकशी करून १ मासात अहवाल सादर केला जाईल.

राज्यातील गायरान भूमीवरील अतिक्रमण प्रकरणी निष्कासनाच्या कारवाईस पुढील आदेशापर्यंत उच्च न्यायालयाकडून स्थगिती ! – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शासनाच्या यापूर्वीच्या इतर कोणत्याही धोरणानुसार / तरतुदींनुसार संरक्षित होणारी अतिक्रमणे वगळून उर्वरित अतिक्रमणे निष्कासित करावी, अशी – शासनाची भूमिका

उल्हासनगर येथील १ सहस्र अनधिकृत इमारती अधिकृत होणार !

बहुतांश अनधिकृत वसाहती कालांतराने अधिकृत होत असल्याने अनधिकृत बांधकाम करणार्‍यांचे फावले आहे. त्यामुळे मूळच्या अधिकृत वसाहतींच्या मूलभूत सोयी-सुविधांवर भार पडून त्यांच्यावर अन्याय होत नाही का ?

नाशिक येथील सरकारवाडा, मालेगाव किल्ला आणि सुंदरनारायण मंदिर, तर जळगाव येथील पारोळा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकांमध्ये अतिक्रमण !

इतके अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यातील उत्तरदायींवर कठोर शिक्षा झाली पाहिजे !

हिंदू संघटित झाल्यास तिरुपतीसह अनेक मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील ! – बी.के.एस्.आर्. अय्यंगार, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते, आंध्रप्रदेश

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘तिरुपती मंदिरातील भ्रष्टाचार आणि अवैध चर्च निर्माण कसे रोखणार ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

जंगलात अवैधरित्या बांधलेल्या मुसलमानांच्या १५ थडग्यांवर वनविभागाची कारवाई

पौढी येथे बनवण्यात आलेला एक मकबराही हटवण्यात आला. या मकबर्‍याच्या ठिकाणी छत (शेड) उभारण्यासाठी एका स्थानिक आमदाराने त्याच्या आमदार निधीतून २ लाख रुपये संमत केले होते, अशी माहिती समोर आली आहे.

‘कल्पवृक्ष हौसिंग वसाहत’ येथील अवैध बांधकाम तात्काळ न हटवल्यास आंदोलन ! – विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे महापालिकेत निवेदन

येथील शहापूर हद्दीतील ‘कल्पवृक्ष हौसिंग वसाहत’ येथे चालू असलेल्या अवैध बांधकामाची तक्रार २८ जानेवारी २०२२ ला विश्व हिंदु परिषदेकडून तक्रार करण्यात आली होती.

बिहारमध्ये पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात असलेल्या ऐहितासिक बौद्ध गुहेचे मजारीमध्ये रूपांतर !

बिहारमध्ये मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांचे सरकार असल्यामुळे या भूमी जिहाद्यांवर कारवाई होण्याची शक्यता अल्प आहे !  

घाटकोपर (मुंबई) येथे हरित लवादाच्या आरक्षित जागेवर अवैधपणे मदरशाचे बांधकाम !

अवैधपणे मदरशाचे बांधकाम होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ? त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांवर प्रथम कारवाई करा !