शिवडी गडावरील अनधिकृत बांधकाम ३ मासांत काढणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनविकास मंत्री

अनधिकृत बांधकाम हटवण्यासह ते होईपर्यंत झोपा काढणार्‍या प्रशासनातील संबंधितांवरही कारवाई करावी, अशी गडप्रेमींची अपेक्षा आहे !

कब्रस्तानच्या विरोधात ग्रामस्थांचा मोर्चा !

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या शेजारी मुसलमानांचे कब्रस्तान बनवण्याचा महानगरपालिका आणि काही सामाजिक संस्था यांचा घाट असून त्याला अंबरनाथ येथील गावकर्‍यांचा विरोध !

बंटवाळ (कर्नाटक) येथे सरकारी भूमीवर रातोरात स्थापन करण्यात आला येशू ख्रिस्ताचा पुतळा !

मुळात कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना धर्मांध ख्रिस्त्यांचे असे करण्याचे धाडस होतेच कसे ?

आणखी ५ भूमाफियांना अटक, एकूण आरोपींची संख्या १० !

डोंबिवली येथील ६५ अवैध इमारत प्रकरणांशी संबंधित आणखी ५ भूमाफियांना २३ नोव्हेंबरला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष अन्वेषण पथकाने अटक केली. या भूमाफियांनी सर्वसामान्य नागरिकांना अवैध इमारतीमध्ये घर विकून फसवणूक केली आहे.

कामगार नेते आणि धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्या मुलाविरोधात गुन्हा नोंद !

कामगार नेते, तसेच धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांचा मुलगा ऋग्वेद यांनी ३० फूट खोल विहिरीचे अवैध बांधकाम केल्याची तक्रार करण्यात आली होती.

पुणे रेल्वे स्थानक परिसरातील १० धार्मिक संस्थांना १५ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याची रेल्वे प्रशासनाची नोटीस !

पुणे रेल्वे स्थानकात प्रवासी सुविधांसाठी वापरल्या जाणार्‍या परिसरात असलेल्या मोकळ्या जागा अतिक्रमण करणार्‍यांकडून परत घेण्याचा रेल्वेला पूर्ण अधिकार आहे.

प्रतापगडाप्रमाणे लोहगडावरील अतिक्रमण हटवावे ! – शिवभक्तांची पुरातत्व विभागाकडे मागणी

लाखो रुपयांचे वेतन घेणारे पुरातत्व विभागाचे अधिकारी नेमके काय करतात ? असा भोंगळ कारभार असणार्‍या पुरातत्व विभागाकडून गड-दुर्गांचे जतन केले जाईल याची अपेक्षा काय ठेवणार ? कामचुकार अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !

प्रतापगडाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व गडदुर्ग इस्लामी अतिक्रमणांपासून मुक्त करावेत ! – नितीन शिंदे, माजी आमदार आणि निमंत्रक, शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन

सरकारने अन्य गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून त्यांना इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त करावे आणि सर्व गडदुर्गांना गतवैभव प्राप्त करून द्यावे.

सत्पुरुषांच्या संकल्पामुळेच प्रतापगड आंदोलनाला यश !

हिंदूंनी इच्छाशक्ती दाखवून सर्व गडदुर्ग शुद्ध आणि पवित्र करावेत ! शिंदे-फडणवीस शासनाची राजकीय इच्छाशक्ती आणि सुधीर मुनगंटीवार यांचे नियोजनकौशल्य यांमुळे हे कार्य पार पडले. आता आपण हिंदूंनीही इच्छाशक्ती दाखवून सर्व गडदुर्ग शुद्ध आणि पवित्र केले पाहिजेत.

गायरान भूमीवरील अतिक्रमणे काढून घ्यावीत ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान भूमीवरील अतिक्रमणे ३१ डिसेंबरपूर्वी काढून टाकायची आहेत. सांगली जिल्ह्यातील अतिक्रमणे १० दिवसांच्या आत काढून घ्यावीत; अन्यथा ती काढून टाकण्यात येतील. व्यय संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.