हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘तिरुपती मंदिरातील भ्रष्टाचार आणि अवैध चर्च निर्माण कसे रोखणार ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

मुंबई – तिरुपती देवस्थान हे सरकारच्या नियंत्रणात गेल्यावर ते पूर्वीपासून आतापर्यंत सरकारसाठीच काम करत आले आहे. येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेली तिरुपती देवस्थानाच्या जवळ असलेली बांधकामे तोडण्यात आली. येथील धार्मिक परंपरा बंद करण्याचा प्रयत्न केला. सरकार नियंत्रित मंदिर समितीला हिंदूंच्या धार्मिक भावनांशी देणे-घेणे नाही. असे असले, तरी हिंदूंनी आत्मविश्वास न गमावता आपल्या धर्मबांधवांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी. हिंदूंची मंदिरे कह्यात घेण्याविषयी विविध न्यायालयांनी हिंदूंच्या बाजूने दिलेल्या निकालांचा हिंदूंनी अभ्यास करायला हवा. हिंदू संघटित झाल्यास तिरुपतीसह अनेक मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील, असे प्रतिपादन आंध्रप्रदेश येथील पत्रकार, सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. बी.के.एस्.आर्. अय्यंगार यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘तिरुपती मंदिरातील भ्रष्टाचार आणि अवैध चर्च निर्माण कसे रोखणार ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

हिंदूंच्या देवस्थानात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी हिंदूंनी सतर्क रहायला हवे ! – श्रीमती एस्थर धनराज, सहसंचालिका, भगवद्गीता फाऊंडेशन फॉर वैदिक स्टडीज, तेलंगाणा

तिरुपती देवस्थानात ख्रिस्ती पंथीय व्यक्ती कारभार चालवून अपप्रकार करत आहेत. अशांना हाकलून द्यायला हवे. ते नियोजनबद्धरित्या हिंदूंच्या देवस्थानात घुसखोरी करत देवस्थाने पोखरत आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी हिंदूंनी सतर्क राहून यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करायला हवी. यासाठी कठोर कायदे होणे आवश्यक आहेत आणि राज्यघटनेतील काही कलमांमध्येही पालट होणे आवश्यक आहे. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित पुढाकाराने या परिस्थितीमध्ये नक्कीच पालट होईल, असा मला विश्वास वाटतो.
हे पहा –
हिन्दू जनजागृति समिति आयोजित 🔊 विशेष संवाद
🚩 चर्चा हिन्दू राष्ट्र की..
🌸 तिरुपति मंदिर में भ्रष्टाचार एवं अवैध चर्च निर्माण पर रोक कैसे लगाएं ?
_________________________________
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !