बिहारमध्ये पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात असलेल्या ऐहितासिक बौद्ध गुहेचे मजारीमध्ये रूपांतर !

(मजार म्हणजे इस्लामी पीर किंवा फकीर यांचे थडगे)

पाटलीपुत्र – राज्यात असलेल्या ऐतिहासिक बौद्ध गुहेवर भारतीय पुरातत्व विभागाचे नियंत्रण आहे; मात्र ही गुहा भूमी जिहाद्यांनी बळकावली असून त्याचा ‘मजार’ म्हणून वापर केला जात आहे. ही गुहा आता धर्मांध मुसलमानांच्या कह्यात असून ते आतमध्ये नमाजपठण करतात. गौतम बुद्ध यांनी ज्ञानप्राप्तीनंतर एक रात्र या गुहेमध्ये मुक्काम केल्याचा उल्लेख सम्राट अशोकाने तेथे लिहिलेल्या एका शिलालेखात आढळतो. त्यामुळे या गुहेला ऐतिहासिक महत्त्व आहे.

१. वर्ष १९१७ मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने ही गुहा ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित केली होती. वर्ष २००५ मध्ये मुसलमानांनी या ऐतिहासिक गुहेत अतिक्रमण केले आणि प्रवेशद्वार बसवून इतरांना प्रवेश प्रतिबंधित केला. ‘ही सुफी संतांची मजार आहे’, असे सांगत मुसलमानांनी त्याचे प्रार्थनास्थळात रूपांतर केले.

२. मुसलमानांनी गुहेचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारा सम्राट अशोकाचा शिलालेख पांढरा चुना लावून पुसून टाकला, तसेच शिलालेख तोडून टाकण्याचा प्रयत्न केला. गुहेत बौद्ध धर्माचे कुठलेही चिन्ह शिल्लक राहू नये, यासाठी त्यांनी शिलालेख हिरव्या कपड्याने झाकला. मुसलमानांनी तेथे प्रतिवर्ष उरूस (एखाद्या मुसलमान धर्मगुरूच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित उत्सव) आयोजित करण्यास चालू केले आहे. तसेच त्यांनी गुहेजवळच्या जागेत अतिक्रमण करून दर्गा बांधला आहे.

३. वर्ष २००८ मध्ये हे अतिक्रमण भारतीय पुरातत्व विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. वर्ष २००८ ते वर्ष २०१८ पर्यंत भारतीय पुरातत्व विभागाने रोहतास जिल्हा प्रशासनाला २० पत्रे लिहून अतिक्रमण हटवण्याची विनंती केली होती; मात्र जिल्हा प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. (असले प्रशासन भारताच कि पाकचे ? – संपादक)

४. भारतीय पुरातत्व विभागाने त्या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व आणि बौद्ध धार्मिक स्वरूप विशद करणारा आणि ती वास्तू एक संरक्षित स्मारक असल्याचा उल्लेख करणारा एक फलक तेथे लावला; परंतु भूमी जिहाद्यांनी तो फलक काढून टाकला आणि ‘एक सुफी संत गुहेत रहात होता, तिथेच तो मरण पावला आणि गुहेच्या आत त्याला पुरले आहे’, अशी भाकड कथा पसरवायला चालू केले.

५. स्थानिक प्रशासनाने मात्र भूमी जिहाद्यांसमोर हात टेकले आहेत. जिल्हाधिकारी धर्मेंद्र कुमार यांनी सांगितले की, या ऐतिहासिक गुहेच्या प्रवेशद्वाराची एक चावी भारतीय पुरातत्व विभागाकडे राहील, तर दुसरी चावी मुसलमानांकडे असेल. भारतीय पुरातत्व विभाग शिलालेखाची काळजी घेईल, तर मुसलमान गुहेच्या आत बनवलेल्या मशिदीत प्रार्थना करतील.

 संपादकीय भूमिका

  • बौद्ध गुहेचे मजारीत रूपांतर होईपर्यंत पुरातत्व विभाग झोपला होता का ? पुरातत्व विभागाने भारतातील हिंदूंच्या किती धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तूंचे रक्षण केले ?’, हा एक संशोधनाचा विषय आहे. हा विभाग विसर्जित करून इतिहासप्रेमी आणि कर्तव्यनिष्ठ लोकांची नियुक्ती या विभागात होणे आवश्यक आहे !
  • बिहारमध्ये मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांचे सरकार असल्यामुळे या भूमी जिहाद्यांवर कारवाई होण्याची शक्यता अल्प आहे !