ब्रह्मगिरी पर्वतावरील अनधिकृत कामाविषयी जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल मागवणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नागपूर, २८ डिसेंबर (वार्ता.) – पर्यावरणाचा समतोल ढासळेल असे कोणतेही काम ब्रह्मगिरी पर्वतावर होऊ देणार नाही. याविषयी जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल मागवण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिले.

 (सौजन्य : Vedh News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी ब्रह्मगिरी हे धार्मिक स्थान असून या पर्वतावर अनेक भाविक येतात. हा धार्मिक पर्वत पोखरला जात असून  पर्वतावरील नैसर्गिक धबधबे सिमेंटने बंद करण्यात येत आहेत, हे सूत्र लक्षवेधी सूचनेच्या वेळी सभागृहात उपस्थित केले होते.

 (सौजन्य : ABP MAJHA)
_______________________________________