जंगलात अवैधरित्या बांधलेल्या मुसलमानांच्या १५ थडग्यांवर वनविभागाची कारवाई

उत्तराखंडमध्ये २ सहस्रांहून अधिक अवैध थडगी असण्याची शक्यता

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील डेहराडून आणि पौढी जिल्ह्यातील जंगलांमध्ये अवैधरित्या बांधण्यात आलेल्या मुसलमानांच्या थडग्यांपैकी १५ थडगी वनविभागाकडून उद्ध्वस्त करण्यात आली. २ थडग्यांची कागदपत्रे असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. पौढी येथे बनवण्यात आलेला एक मकबराही (थडग्यावर उभारण्यात आलेली इमारत) हटवण्यात आला. या मकबर्‍याच्या ठिकाणी छत (शेड) उभारण्यासाठी एका स्थानिक आमदाराने त्याच्या आमदार निधीतून २ लाख रुपये संमत केले होते, अशी माहिती समोर आली आहे.

१. काही दिवसांपूर्वी देहली येथील एका कार्यक्रमात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी अवैधरित्या बनवण्यता येणार्‍या थडग्यांविषयी विधान केले होते.

२. राज्यातील स्वामी दर्शन भारती यांनी सांगितले की, ३७ वर्षांपूर्वी राज्यात एकही मशीद नव्हती. राज्यात २ सहस्रांहून अधिक थडगे असण्याची शक्यता आहे.