उज्जैन (मध्यप्रदेश) येथे भगवान महाकालच्या पालखी यात्रेमध्ये सहभागी झालेल्यांवर छतावरून थुंकणार्‍या ३ मुलांना अटक !

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथे हिंदूंच्या धार्मिक यात्रेच्या वेळी छतावरून थुंकण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली. हे तिघेही अल्पवयीन असल्याने त्यांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलिसांकडे दोषींवर कारवाई करण्यासह ते ज्या घरात रहात आहेत, त्या घराची कागदपत्रे तपासण्याची मागणी केली आहे.

१७ जुलै या दिवशी येथील खार कुआ भागात भगवान महाकाल यांची पालखी निघाली होती. त्यात सहस्रो भाविक सहभागी झाले होते. सायंकाळी टाकी चौकाजवळ लोक घरांच्या छतावर उभे राहून पालखी पहात असतांना एक मुलगा पालखीत सहभागी झालेल्यांवर थुंकत असल्याचे दिसून आले. लोकांनी या घटनेचे चित्रीकरण केले आणि ते सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलीस ठाण्यात जाऊन कारवाईची मागणी केली.

मुसलमानांकडून पोलिसांसमोर अल्पवयीन मुलांची बाजू मांडण्याचा प्रयत्न !

पालखीत सहभागी झालेल्यांवर थुंकणार्‍या संबंधित ३ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी कह्यात घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात मुसलमान जमा झाले आणि त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

संपादकीय भूमिका 

हिंदूंच्या धार्मिक यात्रांत अशा प्रकारची कृत्ये करण्याचे धाडस होणे बहुसंख्य हिंदूंना लज्जास्पद !