सांगली – गेली २० वर्षे तीव्र लढा उभा करून प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या थडग्याभोवतीच्या दर्ग्याचे अतिक्रमण हटवण्यासाठी रस्त्यावरची आणि विधान भवनातील लढाई आम्ही केली. यामुळे हे अवैध बांधकाम हिंदुत्वनिष्ठ सरकारने उद्ध्वस्त केले. त्याच धर्तीवर आता ‘विशाळगड मुक्ती आंदोलना’च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणावर घाव घालण्याची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केले. १३ जुलैला लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे सांगली जिल्ह्यातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
१. हा मेळावा भाजपचे युवा नेते श्री. गौतम पवार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. हणमंतराव पवार, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. विष्णुपंत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. राजेश देशमाने यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला.
२. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून आंदोलनाच्या स्फूर्ती मशालीचे दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर नरवीर बाजीप्रभु देशपांडे, वीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हिंदू एकता आंदोलनाचे संस्थापक कै. नारायणराव कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वहाण्यात आली.
३. या प्रसंगी श्री. गौतम पवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई, श्री. ओंकार शुक्ल, श्री. बाळासाहेब पाटील, डॉ. भालचंद्र साठे आदींची भाषणे झाली.
४. या मेळाव्यास सर्वश्री अभिमन्यू भोसले, प्रसाद रिसवडे, राहुल बोळाज, अमोल काळे, अजित काशीद, विजय भिडे, बाळासाहेब मोहिते-पाटील, अजय काकडे, प्रथमेश वैद्य, शुभम चव्हाण, सुहास कलघटगी यांसह शिवभक्त, राष्ट्रभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.