अखिल भारत हिंदु महासभेच्या कार्यकर्ता मेळाव्यात हिंदुत्वाचे कार्य जोमाने पुढे नेण्याचा निर्धार !

कार्यकर्ता मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित विविध मान्यवर

कोल्हापूर – हिंदुत्वासाठी अनेक जण कार्य करतात; मात्र प्रशिक्षणाच्या अभावी त्यांना कार्य करण्यासाठी नेमकी दिशा मिळत नाही. नुकताच कोल्हापूर येथे धर्मांधांनी स्टेटस ठेवण्यावरून हिंदूंचा जो उद्रेक झाला, त्यात अनेक हिंदु कार्यकर्त्यांना कारागृहवास पत्करावा लागला. या कार्यकर्त्यांना अधिवक्ता पुष्पक काकडे आणि त्यांचे सहकारी यांनी तात्काळ कायदेशीर साहाय्य दिले. या प्रकरणी ज्यांनी कारागृहवास पत्करला अशांचा सत्कार आणि हिंदु कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण मेळावा ‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या वतीने हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यालयात १३ जुलैला आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात हिंदुत्वाचे कार्य जोमाने पुढे नेण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन हिंदु महासभेचे श्री. संजय कुलकर्णी यांनी केले.

मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. शिवानंद स्वामी

मनोहर सोरप यांना ‘महाराष्ट्र हिंदु मावळा’ पुरस्कार !

या प्रसंगी हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप यांना अधिवक्ता दत्ता सणस आणि श्री. आनंद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत अन् मान्यवरांच्या हस्ते ‘महाराष्ट्र हिंदु मावळा’ पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, अधिवक्ता दत्ता सणस, प्रदेश प्रवक्ते श्री. आनंद कुलकर्णी, श्री. कुलदीप जाधव आणि श्री. संभाजी साळोखे यांनी मार्गदर्शन केले.

मेळाव्यात श्री. मनोहर सोरप (काळी हॅट घातलेले) यांना ‘महाराष्ट्र हिंदु मावळा पुरस्कार’ देतांना विविध मान्यवर
मान्यवरांचे मनोगत

याप्रसंगी अधिवक्ता दत्ता सणस म्हणाले, ‘‘हिंदु महासभेची स्थापना हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी झाली आहे. हिंदु महासभा भारतात दीर्घ काळापासून हिंदुत्वाचे कार्य करत आहे.’’ श्री. आनंद कुलकर्णी म्हणाले, ‘‘या देशात हिंदू समाज मोठ्या संख्येने असून त्यांच्यात जागृतीसाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत. आपण राजकारणाचा विचार न करता हिंदु धर्माचा प्राधान्याने विचार करायला हवा.’’

श्री. शिवानंद स्वामी म्हणाले, ‘‘काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्डा’ला पाशवी अधिकार दिले.  या कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ केला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १५८ जागा ‘वक्फ’ने बळकावल्या आहेत. याला हिंदूंनी संघटिपणे विरोध केला पाहिजे.’’