ग्वाल्हेर येथे हिंदु महासभेकडून ‘गोडसे ज्ञानशाळे’चा प्रारंभ !

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – येथे हिंदु महासभेकडून ‘गोडसे ज्ञानशाळा’ प्रारंभ करण्यात आली असून त्याद्वारे पंडित नथुराम गोडसे यांचे विचार युवकांपर्यंत पोचवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हिंदु महासभेचे राष्ट्रीय महामंत्री देवेंद्र पांडे यांच्यावर प्राणघातक आक्रमण

आरोपींना त्वरित अटक करण्याची अखिल भारतीय हिंदु महासभेची मागणी – भाजपच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण होणे अपेक्षित नाही ! तेथील हिंदुत्वनिष्ठांना आश्‍वस्त करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

हिदूंसाठी शिवप्रतापदिन म्हणजे दसरा-दिवाळी यांसारखाच सण ! – मोहन शेटे, संस्थापक अध्यक्ष, इतिहासप्रेमी मंडळ

संपूर्ण विश्‍वात गाजलेल्या युद्धांपैकी एक अफझलखान वध, हे महाराजांच्या युद्धनीतीचे वैशिष्ट्य आणि शौर्याचा आदर्श आहे. आज अफझलखान वधाचे आणि शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचे छायाचित्र लावण्यास विरोध केला जातो.

अल्पसंख्यांकांच्या दबावाखाली येऊन भारताला हिंदु राष्ट्र घोषित करता येत नसेल, तर भाजपने हिंदु प्रदेश निर्माण करावा ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

काश्मीरमध्ये हिंदू अल्प झाल्यावर त्यांच्यावर प्रचंड अत्याचार झाले. इस्लाम धर्मियांच्या वाढत्या संख्येला वेसण घालण्यासाठी देशात समान नागरी कायदा त्वरित आणावा.

रा.स्व. संघाचे मा.गो. वैद्य यांच्या निधनाविषयी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून शोक व्यक्त

‘‘संघ परिवारासाठी मा.गो. वैद्य यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राष्ट्र उभारणीतील त्यांचे अतुल कार्य सदैव स्मरणार्थ राहील.’’

डॉ. आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वहाण्यास गेलेले हिंदु मक्कल कत्छीचे अर्जुन संपथ यांच्याशी द्रमुक आणि व्ही.सी.के. यांच्या कार्यकर्त्यांकडून गैरवर्तन

समानतेसाठी लढा देणार्‍या बाबासाहेबांच्या नावाखाली अशा प्रकारचे गैरव्यवहार करणारे राजकीय पक्ष कधीतरी समाजाचा व्यापक विचार करू शकतील का ?

अन्सारींचे नक्राश्रू !

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘इस्लाम संकटात’, असे उपरोधिक बोलून तेथील शिक्षकावर धर्मांध मुलाकडून झालेल्या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ संबोधले, तसेच आतंकवाद्यावर कारवाई करून देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची घोषणा केली. भारताच्या शासनकर्त्यांना हे केव्हा उमजणार आहे ? हा प्रश्‍न आहे !