डॉ. कालिदास वायंगणकर यांना मारहाण होऊन १२ दिवस उलटूनही पोलिसांकडून ख्रिस्ती गुन्हेगारांवर कारवाई नाही !

  • डॉ. कालिदास वायंगणकर यांची फादर कॅनेथ आणि इतर यांच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

  • शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी कृतीशील असलेले डॉ. कालिदास वायंगणकर यांना ख्रिस्त्यांकडून पोलिसांसमक्ष जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण

अल्पसंख्यांकांच्या विरोधात तक्रार नोंदवायला पोलीस का कचरतात ? हिंदूंच्याच देशात हिंदूंना अशी वागणूक मिळणे दुर्दैवी आणि संतापजनकच ! डॉ. कालिदास वायंगणकर यांच्या जागी एखादा ख्रिस्ती असता, तर पोलिसांनी अशीच भूमिका घेतली असती का ?

श्री विजयदुर्गा माता, शंखवाळ-(सांकवाळ) गोवा

सांकवाळ (गोवा) १४ जानेवारी (वार्ता.) – शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी कृतीशील असलेले डॉ. कालिदास वायंगणकर यांना ख्रिस्त्यांनी पोलिसांसमक्ष जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेला आता १२ दिवस उलटूनही अजूनही पोलिसांकडून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिसांसमक्ष जिवे मारण्याचा प्रयत्न होऊनही गुन्हेगारांवर कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी आता प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (पोलिसांमध्ये कार्यक्षमता आहे; पण ती अल्पसंख्यांकांपुढे वापरली जात नाही ! – संपादक) गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस आणि प्रशासन तृणमूल काँग्रेसचे खिस्ती नेते चर्चिल आलेमाव आणि आलेक्स रेजिनाल्ड, तसेच चर्च संस्था यांच्या विरोधामुळे दबावाखाली येऊन १६ जानेवारी या दिवशी वारसास्थळी अनधिकृतपणे होणार असलेले फेस्ताचे आयोजन सुरळीतपणे कसे होईल, यासाठीच सक्रीय असल्याचे दिसत आहे.

डॉ. कालिदास वायंगणकर

या प्रकरणी डॉ. कालिदास वायंगणकर यांनी १३ जानेवारी या दिवशी फादर कॅनेथ आणि स्थानिक ख्रिस्ती यांच्या विरोधात दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. गुन्हेगारांवर खुनी आक्रमण करणे आणि दरोडा घालणे या गुन्ह्यांखाली कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. (अशी मागणी करावी लागणे पोलिसांसाठी लज्जास्पद ! – संपादक)

शंखवाळी (सांकवाळ) तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणाला शासनाने वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे आणि याला ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (सांकवाळचे प्रवेशद्वार) असे नाव दिले आहे. या वारसास्थळाच्या ठिकाणी ख्रिस्त्यांनी गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदा १६ जानेवारी या दिवशी फेस्ताचे आयोजन केले आहे. या निमित्ताने वारसा स्थळी अनधिकृतपणे मंडप घालण्यात आला आहे. या ठिकाणी २ जानेवारी या दिवशी सकाळी सुमारे १०० स्थानिक ख्रिस्ती वारसा स्थळाच्या बाजूच्या भूमीची स्वच्छता करण्यासाठी गेले होते. हा प्रकार बंद करण्यासाठी डॉ. कालिदास वायंगणकर पोलीस संरक्षणासह घटनास्थळी गेले असता ख्रिस्ती जमाव एकत्र होऊन त्यांनी शिवीगाळ करून त्यांना तेथून हाकलले आणि जिवे मारण्यासाठी त्यांच्यावर आक्रमण केले. सुदैवाने ते वाचले.


हे पण वाचा –

शंखवाळ-(सांकवाळ) गोवा, येथील पुरातन श्री विजयदुर्गा मंदिराच्या स्थानाचे रक्षण व्हावे !

https://sanatanprabhat.org/marathi/542197.html


डॉ. कालिदास वायंगणकर यांनी १३ जानेवारी या दिवशी दिलेल्या तक्रारीत सर्व घटनांचा उल्लेख करतांना म्हटले आहे, ‘‘मला मारहाण केली जात असतांना तेथील ख्रिस्त्यांचा जमाव ‘मारून टाका त्याला’ असे मोठमोठ्याने ओरडत होता; मात्र पोलिसांनी जमावाला रोखल्याने माझा जीव वाचू शकला.’’

शंखवाळ येथील श्री विजयादुर्गा मंदिराची भूमी हडप करण्याचा चर्च संस्थेच्या कारस्थानाचा हिंदू रक्षा महाआघाडीच्या मेळाव्यात निषेध

शंखवाळ येथील श्री विजयादुर्गा मंदिराची भूमी हडप करण्याच्या चर्च संस्थेच्या कारस्थानाचा हिंदू रक्षा महाआघाडीच्या पेडणे तालुका समितीच्या प्रतिनिधी मेळाव्यात निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे या पवित्र स्थानाच्या रक्षणासाठी झटणार्‍या श्री विजयादुर्गा देवस्थान पुनर्निमाण समितीला मेळाव्यात पूर्ण पाठिंबा व्यक्त करणारा ठराव ‘ॐ’ च्या उच्चाराने सर्वानुमते संमत करण्यात आला.

या मेळाव्याला पेडणे तालुक्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या १९ संघटनांचे ३५ प्रतिनिधी उपस्थित होते. मेळाव्याला राष्ट्रीय बजरंग दलाच्या गोवा शाखेचे निमंत्रक नितीन फळदेसाई, हिंदू रक्षा महाआघाडीच्या सुकाणू समितीचे सदस्य संदीप पाळणी, प्रवीण नेसवणकर, पेडणे शाखा निमंत्रक आत्माजी नाईक, ‘भारत माता की जय’ संघाचे मांद्रे प्रभाग संघचालक गजानन मांद्रेकर आणि नामवंत योगशिक्षक डॉ. सूरज काणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिंदोळी येथील अवर लेडी ऑफ हेल्थचे फादर कॅनेथ यांचा वारसा स्थळाच्या भूमीचा मालकी अधिकार असल्याचा दावा खोटा

शिंदोळी येथील अवर लेडी ऑफ हेल्थचे फादर कॅनेथ यांनी त्यांच्याकडे शंखवाळी येथील वारसा स्थळाच्या भूमीचा (सर्वेक्षण क्रमांक २६६/२) मालकी अधिकार असल्याचा दावा केला आहे. हे वारसा स्थळ हे ‘फाब्रिका ऑफ चर्च ऑफ सांकवाळ’ असल्याची खोटी माहिती दिली जात आहे, असा दावा शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी कृतीशील असलेल्या हिंदूंनी केला आहे. हिंदूंच्या मते वास्तविक सांकवाळ येथे ‘चर्च ऑफ सांकवाळ’ या नावाने एकही चर्च नाही. फादर कॅनेथ यांच्याकडे त्यांचा दावा सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे नाहीत.