काश्मिरी नेते सुशील पंडित यांच्या हत्येसाठी आलेल्या दोघा गुंडांना देहली पोलिसांकडून अटक

पाक आणि दुबई येथून हत्येसाठी २० लाख रुपयांची सुपारी !

हिंदूंचे नेते असुरक्षित असून त्यांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

काश्मिरी नेते सुशील पंडित

नवी देहली – काश्मिरी नेते सुशील पंडित यांच्या हत्येची सुपारी घेतल्याच्या प्रकरणी देहली पोलिसांनी २ गुंडांना अटक केली. ते सिग्नल अ‍ॅपद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्याकडून पाकिस्तानी बनावटीची २ पिस्तुले आणि २ गावठी कट्टे जप्त करण्यात आले. सुखविंदर सिंह आणि लखन अशी गुंडांची नावे आहेत. हे दोघेही पंजाबच्या फरीदकोट येथील आहेत.

(हिंदुत्वनिष्ठ नेत्याच्या हत्येसाठी जिहाद्यांशी हातमिळवणी करणार्‍या अशा राष्ट्रघातक्यांना कठोर शिक्षा करा ! – संपादक) गुंड प्रिंस याने या दोघांना सुशील पंडित यांची हत्या करण्यासाठी देहलीत पाठवले होते. त्याला पाक आणि दुबई येथील जिहाद्यांनी २० लाख रुपयांची सुपारी दिली होती. प्रिंस आणि लखन मित्र आहेत.