भाजपशासित राज्यांत त्यांच्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होणे, अपेक्षित नाही ! देशातील सर्वच हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण होण्यासाठी केंद्र आणि भाजपशासित राज्यांच्या सरकारांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असे हिंदूंना वाटते !

गोहत्ती (आसाम) – मध्यप्रदेशमधील रीवा आणि आसामच्या तिनसुकिया येथे भाजपच्या दोघा कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. रीवा येथे भाजपचे ग्राम संयोजक सुरेंद्र तिवारी यांची, तर तिनसुकिया जिल्ह्यातील पक्षाचे बूथ अध्यक्ष देवानंद गोगोई यांची हत्या करण्यात आली. गोगोई यांची त्यांच्या घराबाहेर पोटात धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी जयचंद्र गोगोई याला अटक करण्यात आली आहे. तो याच गावात रहाणारा आहे.
Assam BJP booth president stabbed to death ahead of polls; CM Sonowal assures action https://t.co/PKAdyZwdFZ
— Republic (@republic) March 13, 2021
शिवरात्रि के दिन मंदिर जा रहे थे बीजेपी नेता, अपराधियों ने बीच सड़क पर धारदार हथियार से गला रेत दिया https://t.co/D2ohBr22zW via @NavbharatTimes
— NBT Hindi News (@NavbharatTimes) March 12, 2021
मध्यप्रदेशातील नौढिया गावामध्ये भाजपचे ग्राम संयोजक सुरेंद्र तिवारी यांची ६ हून अधिक गुंडांनी धारदार शस्त्राद्वारे आक्रमण करून हत्या केली. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !