आगरा येथे गोतस्करी रोखण्यासाठी गेलेल्या हिंदु महासभेच्या जिल्हाध्यक्षांवर धर्माधांकडून प्राणघातक आक्रमण !

उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यव्यस्थेचे धिंडवडे चालूच ! राज्यात गोहत्याबंदी कायदा असतांनाही अशा प्रकारे गोतस्करी होतेच कशी ? पोलीस आंधळे आहेत का ? जी माहिती गोरक्षकांना मिळते ती पोलिसांना का मिळत नाही ? कि ‘पोलीस गोतस्करांकडून हप्ते घेतात’, असे हिंदूंनी समजायचे का ?

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील रायभा भागामध्ये ४ एप्रिलच्या रात्री हिंदु महासभेचे  जिल्हाध्यक्ष रौनक ठाकुर गोतस्करी रोखण्यासाठी गेले असता त्यांच्यावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण करण्यात आले. यात ते गंभीररित्या घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

ठाकुर यांनी सांगितले की, राजस्थान येथील क्रमांक असणार्‍या एका गाडीवरील कंटेनरमधून गोवंशियांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. या गाडीला टोल प्लाझा येथे कार्यकर्त्यांसह रोखण्याचा प्रयत्न केला असता गाडीची गती वाढवण्यात आली. मी गाडीचा पाठलाग करत खिडकी पकडली. तेव्हा गाडीतील धर्मांधांनी लोखंडी सळी आणि धारदार शस्त्रे यांद्वारे आक्रमण केले. त्यांनी खिडकी उघडल्यामुळे मी खाली पडलो. नंतर धर्मांध गाडीसह पळून गेले. या घटनेविषयी पोलिसांना कळवण्यात आले. कल्लू, पप्पू आणि शरीफ अशी आरोपींची नावे आहेत.