UKs Patients To India : ब्रिटनहून १२ सहस्र रुग्ण यावर्षी उपचारासाठी भारतात येणार !

ब्रिटनमध्ये १५ सहस्र डॉक्टरांच्या कमतरतेमुळे आरोग्यसेवा ढासळली आहे. अशा वेळी ब्रिटनचे रुग्ण चांगल्या आणि स्वस्त उपचारासाठी भारतात येत आहेत. गेल्या वर्षी ब्रिटनहून सुमारे १ सहस्र २०० रुग्ण भारतात आले होते.

महाराष्ट्रातील १५० पैकी ४० ट्रॉमा केअर सेंटर बंद असल्याचे ‘सुराज्य अभियाना’च्या माहिती अधिकारातून उघड !

रस्ते अपघातांच्या वेळी रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, जेणेकरून अपघातग्रस्तांच्या मृत्यूंचे प्रमाण अल्प व्हावे, यासाठी राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर १५० ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत मात्र यांतील ४० ट्रॅामा केअर सेंटर बंद आहेत.

आरोग्य केंद्रांसह रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष चालू ! – कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी

वाढत्या तापमानामुळे आणि आर्द्रतेमुळे उन्हात फिरणार्‍या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता आहे. लोकांनी तीव्र उन्हात फिरू नये, तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

‘रेबीज फ्री पुणे’ करण्यासाठी महापालिका १ लाख ८० सहस्र प्राण्यांना लस देणार !

अभिनंदनीय निर्णय असला, तरी ‘उशिरा सुचलेले शहाणपण’, असेच म्हणावे लागेल !

सध्या चालू असलेल्या वसंत ऋतूत सब्जा कधीतरी आणि अल्प मात्रेत सेवन करणे योग्य !

सध्या ऊन वाढत असल्याने शरिराला थंडावा म्हणून कित्येक जण सब्जा खात आहेत. सध्या वसंत ऋतू चालू आहे. हा निसर्गतः कफ वाढण्याचा काळ असल्याने नियमितपणे सब्जा खाणार्‍यांना सर्दी-खोकल्याचे त्रास बळावू शकतात.

कुलर वापरतांना विद्युत् सुरक्षेविषयी काळजी घ्या ! – महावितरणचे आवाहन

कुलर वापरत असतांना ओल्या हाताने तो चालू वा बंद करणे, त्यास स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करावा. कुलरच्या पंख्यासमोर जाळी लावलेली असावी.

ताक थंड आणि प्रकृतीला चांगले म्हणून ते उन्हाळ्यात सतत पिऊ नका !

‘एका रुग्णाने सांगितले, ‘‘डॉक्टर तुम्ही ताक एकदम न्यून करायला सांगितले आणि माझ्या पचनाच्या निगडित आंबट घशाशी येणे, जळजळ या तक्रारी पूर्णच थांबल्या. ताकानेही त्रास होतो, हे ठाऊक नव्हते. ते प्रकृतीला चांगले असते, उत्तम ‘प्रो-बायोटिक्स’आहे. त्यामुळे कायम भरपूर प्यावे, असेच वाचले होते.’’

आंबा प्रमाणात खा आणि स्वस्थ रहा !

मधुमेह असेल, तर हेच प्रमाण ठेवावे. आंबा खाल्ल्यावर प्रति २ घंट्यांनी साखर पडताळावी आणि साखर अधिक प्रमाणात वाढत नसेल, तर आंबा खायला काही हरकत नाही. २-३ वेळा साखर पडताळावी, जेणेकरून आंबा खाल्ल्यावर समजेल की, आंबा खायचा कि नाही ?

Goa High Temperature : उन्हाळी गर्मीच्या उद्रेकापासून वाचण्यासाठी गोव्यात आरोग्य संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना

आरोग्य सेवा संचालनालयाने उन्हाळ्यात गर्मीच्या उद्रेकापासून वाचण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सावधानता सूचना जारी केल्या आहेत. त्या देत आहोत . . .

छत्रपती संभाजीनगर येथे तापमानात वाढ होताच प्रतिदिन १०० उष्माघातसदृश रुग्ण !

शहरातील महापालिकेच्या ४० आरोग्य केंद्रांत दिवसभर ४० रुग्ण उपचारासाठी येतात’, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांनी दिली.