गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस देण्यासाठी शासन प्रयत्नशील ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा’अंतर्गत विशेष पडताळणी मोहिमेचा शुभारंभ !

अजित पवार, उपमुख्यमंत्री

पुणे : महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. यावर एक नवीन लस आल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. ही लस राज्यातील महिला आणि मुली यांना कशी देता येईल ? याविषयी महायुती सरकार प्रयत्नशील आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा’च्या अंतर्गत विशेष पडताळणी मोहिमेचा शुभारंभ आणि राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले,

‘‘आरोग्य विभागाच्या वतीने राज्यातील २ कोटी महिलांची आरोग्यविषयक पडताळणी करून त्यांच्यावर आवश्यक त्या सर्व प्रकारचे उपचार करण्यात येत आहेत. राज्यशासनाच्या १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातील २ कोटी बालकांची आरोग्य पडताळणी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाचेही लोकार्पण करून अधिकाधिक आरोग्यविषयक सेवा देण्याचे काम चालू आहे.