हृदय स्वस्थ राखण्याचे उपाय

‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’ने चिकित्सक रुग्णांच्या आहाराविषयी बोलतांना सांगितले आहे, तसेच हृदयाला स्वस्थ राखणार्‍या खाद्यपदार्थांविषयी पुढील निर्देश कार्यवाहीत आणण्यास सांगितले आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

१. वजन संतुलित ठेवून हृदयाशी निगडीत संभावित हानी न्यून केली जाऊ शकते. वयाच्या प्रत्येक दशकात ऊर्जेची आवश्यकता ७० ते १०० कॅलरी घटते. त्यामुळे भोजनावर नियंत्रण ठेवावे. अधिक पोषक तत्त्वे देणारी गडद रंगाची फळे आणि भाज्या व्याधींना रोखतात. फळाचा रस घेण्यापेक्षा अखंड फळ खाल्ले, तर रुग्णाला तंतूमय खाद्य (फायबर) अधिक मिळतात.

२. प्रक्रिया करून साल काढलेल्या (पॉलीश केलेल्या) धान्यातील पोषक तत्त्वे नष्ट होतात. पॉलीश न केलेल्या सालीसहित धान्यामध्ये कोंडा, अंतर्बिज (एंडोस्पर्म) या व्यतिरिक्त धान्याच्या कणात ३ स्तर असतात. त्यात पोषक तत्त्वे भरपूर असतात. अभ्यासाअंती सिद्ध झाले की, सालीसहितचे अन्न हृदयाला हानीकारक कारणांवर नियंत्रण ठेवण्यात साहाय्यक असते.

३. प्रथिनांसाठी शेंगा, कडधान्ये, उदा. सोयाबीन, डाळी, चणे, वाटाणा यांचा उपयोग करावा. कडधान्ये आणि शेंगा प्रथिनांसह तंतूंचा स्रोत असतात. वजन, लठ्ठपणा रोखण्यासाठी दुग्ध उत्पादने अल्प स्निग्ध, चरबीमुक्त निवडावीत.

४. तज्ञ म्हणतात, ‘पॉलीअनसॅच्युरेटेड’ चरबी असणारे, उदा. सोयाबीन, मका, सूर्यमुखी, तीळ, जवस यांचे तेल चांगले असते. हृदयातील रक्तप्रवाहासंबंधीची हानी ३० टक्क्यांनी घटते. उष्णकटिबंध प्रदेशातील खोबरेल तेल, पाम तेल यांमुळे ‘कोलेस्ट्रॉल’ वाढते.

५. अतिरिक्त साखरेचे पदार्थ खाणे टाळल्याने मधुमेह, हृदयासंबंधी रोग वाटतो. मीठ न्यून खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात रहातो.