साधकांची साधनेत घसरण होऊ नये, या तळमळीने काही क्षणांच्या वर्तनावरून निरीक्षण करून त्यांना साहाय्य करणारे परात्पर गुरु डॉक्टर !

आज प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वभावदोष आणि अहं यांमुळे स्वतःच्या जीवनातील आनंदापासून वंचित आहे. त्या आनंदाचा स्रोत स्वतःच्या अंतरातच आहे, हे पुनःपुन्हा सांगून षडरिपुंच्या गर्तेतून साधकांना बाहेर काढणे, हे त्यांच्या प्रीतीचे अत्त्युच्च टोक आहे.

मातृवात्सल्याने साधकांची काळजी घेणारे आणि प्रत्येक क्षणी साधकांचाच विचार करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘भक्त देवाची सेवा करत नाहीत, तर देवच भक्तांची सेवा कशी करतो’, हे परात्पर गुरु डॉक्टरांच्या सहवासात ठायी ठायी दिसून येते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आवश्यक ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केवळ जागृती नाही, तर साधनेने आध्यात्मिक बळ प्राप्त करून हिंदूंचे प्रभावी संघटन केले पाहिजे. पांडव संख्येने अल्प होते; परंतु त्यांच्या मागे साक्षात् भगवान श्रीकृष्ण असल्यामुळे त्यांचा विजय झाला.

समर्थ रामदास स्वामी यांनी प्रवृत्तीवादाविषयी केलेले मार्गदर्शन

‘समर्थ रामदास स्वामी यांची जीवनदृष्टी आणि विचारसरणी, विचारांची परंपरा इतर संतांपेक्षा वेगळीच आहे. त्यांनी अन्य संतांप्रमाणे परमार्थाला महत्त्व दिले; पण तितकेच प्रवृत्तीवादाला सुद्धा दिले आहे.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी कुटुंबाविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘संसार केल्याने केवळ पोट भरते, पुण्य मिळत नाही. संत आणि देव यांची सेवा केल्याने पुण्य मिळते. बायकोची सेवा केल्याने पुण्य मिळत नाही; परंतु आई-वडिलांची सेवा केल्याने निश्‍चित पुण्य मिळते.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने ‘ओकिटॉक’ या ‘ऑनलाईन रेडिओ’वर ‘कोरोना विषाणू – आध्यात्मिक कारणे आणि नवीन आरंभ’ या कार्यक्रमाचे प्रसारण !

‘ओकिटॉक’ या ‘ऑनलाईन रेडिओ’वरील कार्यक्रमात एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले अन् साधिका गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की यांनी विषयाचे सादरीकरण केले.

ह.भ.प. सखारामबुवा बांद्रे महाराज यांच्या वहीतील लिखाणाची निवड करतांना सौ. शालिनी मराठे यांना मिळालेली पूर्वसूचना

‘वह्या किती आहेत ? कुणाच्या आहेत ?’, हे ठाऊक नसतांना देवाने दिलेली ही पूर्वसूचनाच होती. नंतर मला कळले की, ते लिखाण रत्नागिरी येथील प्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प. सखारामबुवा बांद्रे महाराज यांचे आहे.

आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांनी अती चिंता किंवा अती चिंतन टाळावे !

अती चिंता करण्यामुळे अनावश्यक विचार किंवा ताण वाढून आध्यात्मिक त्रासात वाढ होते. अती चिंतन करण्यामुळे बौद्धिक गोंधळ किंवा न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ शकते.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मनुष्य आणि मनुष्यजन्म यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘इतर प्राण्यांपेक्षा देवाने माणसाला भरपूर सुविधा दिल्या आहेत. इतर प्राणी जेवतांना समवेत पाण्याचा तांब्या कुठे ठेवतात ? माणसाला जेवतांना तोंडी लावायला आणि चवीसाठी भाजी-आमटी मिळते.