श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. ‘ज्या कार्यात अध्यात्माचा पाया नाही, त्यामध्ये देव नाही आणि अशा कार्याला यशही लाभत नाही.

२. अध्यात्मात चूक असे काही नसते. प्रत्येक प्रसंग साधकाला घडवण्यासाठी घडतो. ‘प्रसंगातून शिकणे आणि पुढे जाणे’ एवढेच असते.

३. जो साधक ‘ईश्‍वरप्राप्ती’ हे ध्येय ठेवून प्रामाणिकपणे आपले कर्म करत रहातो, तो चुकला, तरी चालेल; गुरु त्या जिवाचा स्वीकार करतात आणि त्याला शिष्य बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. ईश्‍वरप्राप्तीच्या प्रवासात केवळ साधकच नाही, तर त्याहूनही अधिक गुरुच त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात.’

-श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)