लोकांचे एकमेव ध्येय ‘सुखप्राप्ती’ !

प.प. भगवान श्रीधरस्वामी

‘विश्व ही सुखाची एक प्रयोगशाळा आहे. येथे जो प्रयत्न केला जातो, तो एका सुखप्राप्तीसाठीच. जगातील सर्व लोकांचे एकमेव ध्येय कोणते असेल, तर ते ‘सुखप्राप्ती’ हेच होय. असे अगदी ठळक अक्षरांनी लिहून दाखवता येईल.’

यःकश्चित् सौख्यहेतोः त्रिजगति यतते नैव दुःखस्य हेतोः ॥

– शतश्लोकी, श्लोक १५

अर्थ : या त्रैलोक्यात प्रत्येक जण सुखासाठी प्रयत्न करत असतो, दुःखासाठी नव्हे.

‘हा सिद्धांत या लोकांपुरताच आहे, असे नसून तिन्ही लोकांनी उपलक्षित होणार्या, चतुर्दश्लोकात्मक सार्या ब्रह्मांडालाच लागू पडणारा आहे.’

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

(संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, सप्टेंबर १९९६)