सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली साधनेविषयीची मौलिक सूत्रे

१. ‘आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक बऱ्या-वाईट घटना आणि प्रसंग यांसाठी आपण इतरांना उत्तरदायी समजत असतो; परंतु ‘जे घडत असते, ते केवळ आपल्या प्राब्धानुसार घडत असते. आपल्याच कर्माचे ते फळ असते’, हे समजून घेतल्यास इतरांविषयी येणाऱ्या प्रतिक्रिया अल्प होऊ शकतात.
२. मनुष्य पराधीन (ईश्वराधीन) आहे. कर्मयोगातील प्रसिद्ध श्लोक, तरी दुसरे काय सांगतो ? पुढील श्लोकातून हे आपल्याला स्पष्ट होईल.
सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता, परो ददातीति कुबुद्धिरेषा ।
अहं करोमीति वृथाभिमानः स्वकर्मसूत्रग्रथितो हि लोकः ॥
– अध्यात्म रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ६, श्लोक ६
अर्थ : आपल्याला होणारे सुख किंवा दुःख यांचा कोणीही दाता नसून ते आपल्याच कर्माच फळ असते. ‘दुसऱ्यामुळे मला सुख किंवा दुःख मिळते’, असा विचार ही दुर्बुद्धी, अज्ञान आहे. ‘मी सर्व (चांगले) करतो’, असा अभिमान ठेवणेही व्यर्थ आहे; कारण सर्वजण स्वतःच्या कर्माची फळे भोगत असतात.
आपल्या जीवनात सुख-दुःख देणारा कुणीही नाही. दुसऱ्या कुणामुळे मला सुख-दुःख होते’, असे वाटत असेल, तर ती कुबुद्धी (चुकीचे) आहे. ‘मी करतो, मला येते’, असे वाटत असल्यास तोही वृथा अभिमान आहे.
सत्य हे आहे की, पूर्वजन्मी मीच केलेल्या पाप-पुण्याचे फळ या जन्मी एकामागून एक (ज्याप्रमाणे माळ तुटली की, सर्व मणी एकामागून एक बाहेर पडतात त्याप्रमाणे) भोगतो. मण्यांना मागे-पुढे करता येत नाही. त्यांना एकामागून एक यावे लागते. पाप-पुण्य या मण्यांची रचना ईश्वर करतो.’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारे दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर !