प्रतिगोवंश ३६ रुपये अनुदान देण्याचीही मुख्यमंत्र्यांची घोषणा
रायपूर – छत्तीसगड राज्य गोसेवा आयोगाचे संरक्षक संत श्री राम बालकदास यांच्या वक्तव्याचा आदर करत छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी राज्यात लवकरच गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला जाणार असल्याचे सांगितले. तसेच गोशाळांना प्रतिगोवंश ३६ रुपये प्रतिदिन अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घोषित केला. छत्तीसगड राज्य गोसेवा आयोगाच्या स्थापनेनंतर गोसेवा आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विशेश्वर पटेल यांचा शपथविधी सोहळा नुकताच रायपूरच्या दीनदयाळ सभागृहामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, गृहमंत्री अरुण सावजी उपस्थित होते. या वेळी संत रामबालक दास यांच्यासह छत्तीसगडमधील विविध संत महंत उपस्थित होते.
१. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना संत रामबालक दास म्हणाले की, संत विनंती करत नाहीत, तर ते आदेश देतात; म्हणून आम्ही सरकारला आदेश देतो की, छत्तीसगडमध्ये गोमातेला राजमातेचा दर्जा द्यावा, तसेच गोशाळा समित्यांचे अनुदान वाढवण्यात यावे.
२. मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी संत रामबालक दास यांच्या आदेशाचे समर्थन केले आणि सांगितले की, छत्तीसगड राज्यात लवकरच गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला जाईल. तसेच आजपासून गोशाळांमध्ये पाळल्या जाणार्या ३५ सहस्र गायींना प्रतिगोवंश प्रतिदिन ३६ रुपये अनुदान दिले जाईल.
संपादकीय भूमिकावास्तविक गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देऊन तिच्या रक्षणासाठी देशभर प्रयत्न करण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक ! |