‘बाबा रेडीकर गो-गीता सेवा संस्थे’चा १८ एप्रिलला रौप्यमहोत्सवी सोहळा ! – आबा कांबळे, संस्थापक

डावीकडून सौ. आनंदी कांबळे, श्री. आबा कांबळे, श्री. अभय दोशी, डॉ. गुलाबराजे राजे आणि श्री. रमाकांत कांबळे

कोल्हापूर, १६ एप्रिल (वार्ता.) – गेली २५ वर्षे गोसेवा आणि गोरक्षणाचे काम करणार्‍या पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव येथील ‘बाबा रेडीकर गो-गीता सेवा संस्थे’चा १८ एप्रिलला रौप्यमहोत्सवी सोहळा सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. प्रकाश आबीटकर, शिवसेनेचे आमदार श्री. चंद्रदीप नरके, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा यांसह अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती संस्थेचे संस्थापक श्री. आबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. आबा कांबळे म्हणाले, ‘‘१८ एप्रिल १९९९ या दिवशी ३ गायी असतांना चालू झालेल्या या संस्थेत आज १५० पेक्षा अधिक गायी आहेत. तरी या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी, गोप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.’’ या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ. आनंदी कांबळे, स्वागताध्यक्ष श्री. अभय दोशी, डॉ. गुलाबराजे राजे आणि श्री. रमाकांत कांबळे उपस्थित होते.