
मंगळुरू – नैराश्याने त्रस्त असलेल्या एका महिलेला ‘तुमच्यावर कुणीतरी जादूटोणा केला आहे’, असे सांगून उपचाराच्या नावाखाली लैंगिक छळ आणि १ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याच्या प्रकरणी जी. अब्दुल करीम उपाख्य कूळूर उस्ताद याला पोलिसांनी अटक केली.
१. पीडितेला नैराश्य आल्यामुळे तिच्या बहिणीच्या नवर्याच्या सल्ल्यानुसार त्या वेळी ती हेजमाडी येथे असलेल्या उस्ताद अब्दुल करीमच्या घरी गेली होती. त्या वेळी अब्दुल करीम याने महिलेला पाहून ‘तुमच्यावर जादुटोणा केला असून तो उतरवण्यासाठी तुम्हाला वारंवार येथे यायला हवे’, असे सांगितले.
२. पीडित महिला तिच्या बहिणीसमवेत अनेक वेळा या व्यक्तीकडे गेली होती. तिथे त्याने काही वेळा महिलेला कुराण वाचून दाखवल्याचे तिने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
३. काही दिवसांनी पीडितेच्या बहिणीला कामामुळे पीडिता एकटीच हेजमाडी येथील घरी गेली होती. तिथे उस्तादने तिला कुराण वाचायला लावले, त्यानंतर उपचारांच्या नावाखाली तिचा लैंगिक छळ केला आणि महिलेकडून ५५ सहस्र रुपये घेतले.
४. जेव्हा ती हेजमाडीला जात असे, तेव्हा उस्ताद तिला ‘उपचारांसाठी अधिक पैसे लागतील’, असे सांगून तिची फसवणूक करत असे. आतापर्यंत त्याने १ लाख रुपये उकळले आहेत’, असा आरोपही पीडितेने केला आहे.