कोरेगाव पार्क येथील खासगी आस्थापनातील रोखपालाकडून २ कोटींचा अपहार
कोरेगाव पार्क येथील एका खासगी आस्थापनातील रोखपालाने २ कोटी रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी आस्थापनाचे मालक जिनेंद्र दोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रोखपालाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.