Delhi Police Loudspeaker Rules : देहलीमध्ये कोणत्याही धार्मिक स्थळी निर्धारित मानकांपेक्षा मोठ्या आवाजात भोंगे वाजवण्यावर बंदी  !

नवी देहली – देहली पोलिसांनी भोंग्यांविषयी नवीन सूचना प्रसारित केल्या आहेत. आता कोणत्याही धार्मिक स्थळी निर्धारित मानकांपेक्षा मोठ्या आवाजात भोंगा वाजवता येणार नाही. कोणत्याही ठिकाणी भोंगा लावण्यासाठी पोलिसांची अनुमती घ्यावी लागेल. अनुमतीविना सार्वजनिक ठिकाणी भोंगा किंवा सार्वजनिक भाषण प्रणाली वापरता येणार नाहीत. तंबूच्या घरांमधील भोंगा वापरण्यासाठीही पोलिसांची अनुमती आवश्यक असेल. या नियमांचे उल्लंघन केल्यास १० सहस्र रुपये दंड आणि उपकरणे जप्त केली जातील.

पोलिसांनी केलेल्या सूचना –

१. औद्योगिक क्षेत्रात सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ७५ डेसिबल आणि रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ७० डेसिबल आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

२. निवासी भागात सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ५५ डेसिबल आणि रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

३. शांतता क्षेत्रात सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत आवाजाची मर्यादा ५० डेसिबल आणि रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ४० डेसिबल, अशी निश्चित करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

पोलीस आणि प्रशासन नियम बनवतात; मात्र त्यानुसार धार्मिक स्थळांकडून कृती केली जाते कि त्याचे उल्लंघन केले जाते ?, याची पडताळणी केली जात नाही किंवा मशिदींच्या संदर्भात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, असेच दिसून येते !