उपळे येथील श्री सिद्धेश्वर मंदिरातील १०० घंटांची चोरी

प्रतिकात्मक छायाचित्र

वैभववाडी – तालुक्यातील उपळे येथील श्री सिद्धेश्वर मंदिरातील १०० घंटा चोरण्यात आल्याचे १४ एप्रिलला सकाळी मंदिराचे पुजारी अनंत सकपाळ यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी सकपाळ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. महिन्याभरात येथील मंदिरातील घंटा चोरीला गेल्याची ही दुसरी घटना घडली आहे.

या मंदिरात जुन्या आणि नव्या अशा एकूण ३४० घंटा बांधण्यात आलेल्या होत्या. यातील १०० घंटांची चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांचे पथक घटनास्थळी पोचले. चोरीस गेलेल्या घंटा एकूण १० सहस्र रुपये मूल्याच्या होत्या. आठवड्यातून एकदा पुजारी या मंदिरात जातात. त्यानुसार १४ एप्रिलला सकपाळ पूजेला गेल्यावर चोरीची घटना लक्षात आली. या घंटांची चोरी ७ ते १३ एप्रिल या कालावधीत करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या चोरीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी वैभववाडीत दाखल झाले होते.

संपादकीय भूमिका

हिंदूंची  असुरक्षित मंदिरे !