पुणे – लग्नाचे आमीष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी कबीर अहमद खान उपाख्य कबीर अरोरा याच्यावर विश्रांतवाडी येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडितेला पुणे, मुंबई, नेपाळ आणि थायलंडमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ती मुंबईची असल्याने तिने मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. हा गुन्हा विश्रांतवाडी पोलिसांकडे वर्ग होऊन आला आहे. तरुणी पुणे येथे प्रशिक्षणासाठी आली होती. कबीरने ओळख वाढवून तिला लग्नाचे आमीष दाखवत अत्याचार केले, तसेच वेगवेगळी कारणे सांगून पीडितेकडून २५ लाख रुपये घेतले. कबीर पैसे परत देत नाही, तसेच लग्नासही टाळाटाळ करत असल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने तक्रार केली.
संपादकीय भूमिकालग्नाचे आमीष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी कबीर अहमद खान उपाख्य कबीर अरोरा याच्यावर विश्रांतवाडी येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. |