‘कणकवली येथील बांधकाम व्यावसायिकाने सदनिका खरेदी व्यवहारात ग्राहकाची फसवणूक केली. या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने संबंधित ग्राहकाला व्याजासह रक्कम देण्याचा आदेश व्यावसायिकाला दिला. त्यामुळे ग्राहक योगेश गणेश ढवण यांना व्याजासह २६ लाख रुपये भरपाई मिळाले आहेत. या प्रकरणास एकूण ९ वर्षांचा कालावधी लागला आहे. तोपर्यंत ग्राहकाला मनस्ताप सोसावा लागला.’