UK Jails Under Control Of Islamic Gangs : ब्रिटनमधील कारागृहांत जिहादी आतंकवाद्यांकडून अधिकार्‍यांवर आक्रमण : २ अधिकारी घायाळ

ब्रिटनमधील कारागृहे मुसलमान बंदीवानांच्या टोळ्यांच्या नियंत्रणात

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील फ्रँकलँड कारागृहात जिहादी आतंकवादी हाशिम अबेदी याने केलेल्या आक्रमणात २ अधिकारी घायाळ झाले. अबेदी याने त्याच्या अन्य बंदीवान आतंकवाद्यांच्या साहाय्याने या अधिकार्‍यांवर गरम तेल ओतले. ही घटना १२ एप्रिल या दिवशी घडली. या घटनेनंतर ब्रिटनच्या कारागृहांमध्ये मुसलमान बंदीवानांच्या गुन्हेगारी कृत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

१. लंडनमधील ‘टेलिग्राफ’ या वृत्तपत्रातील वृत्तानुसार, फ्रँकलँड कारागृह इस्लामी टोळ्यांच्या नियंत्रणात आहे. ते बंदीवानांवर दबाव आणून किंवा धमकावून त्यांना त्यांच्या टोळीत सहभागी करून घेत आहेत.

२. वर्ष २०१७ पर्यंत ब्रिटनच्या कारागृहांतील आतंकवादाशी संबंधित मुसलमान बंदीवानांची संख्या १८५ होती. सध्या ती १५७ आहे. ही संख्या कारागृहातील एकूण बंदीवानांच्या ६२ टक्के आहे.

३. सध्या ब्रिटनमधील कारागृहे आतंकवादी संघटनांसाठी ‘भरती केंद्र’ बनली आहेत. येथील जिहादी आतंकवादी मुसलमान बंदीवानांचा बुद्धीभेद करून त्यांना त्यांच्या संघटनांमध्ये भरती करून घेत आहेत.

४. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, फ्रँकलँड एका मोठ्या आतंकवादी आक्रमणाच्या दिशेने जात होता. कारागृह प्रशासनाचे दुर्लक्ष आता समोर आले आहे. ही समस्या सामान्य झाली ्रसून त्याकडे कुणीही गांभीर्याने पहात नाही. जोपर्यंत कारागृहांमध्ये कट्टरपंथी जिहादी टोळ्या आणि फुटीरतावाद यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत ब्रिटनमधील कारागृहात अधिकार्‍यांवरील आक्रमणांच्या घटना घडतच रहातील.

५. ब्रिटनमधील कारागृहांत वर्ष २००२ मध्ये जिथे ५ सहस्र ५०० मुसलमान बंदीवान होते. आता ही संख्या १६ सहस्रांहून अधिक झाली आहे. वर्ष २०१९ मधील एका सरकारी अहवालात सांगण्यात आले होते की, काही कारागृहांत ‘मुस्लिम ब्रदरहूड’ नावाने टोळी सक्रीय आहे. धर्माच्या नावावर या टोळ्यांनी कारागृहातच शरीयत न्यायालये स्थापन केली आहेत. तेथे ते अन्य बंदीवानांना शिक्षा करतात. या टोळ्यांचा दबदबा एवढा की, तेच कारागृह चालवतात. अमली पदार्थ आणि पैसे यांची देवाण-घेवाण त्यांच्याद्वारे होते.

संपादकीय भूमिका

ब्रिटनमध्ये ही स्थिती असेल, तर भारतातील कारागृहांत काय स्थिती असेल ?, याचा विचार करता येत नाही. गुन्हेगारी वृत्तीच्या मुसलमानांना कारागृहात ठेवूनही काही परिणाम होत नसेल, तर त्यांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात दगड मारून ठार मारण्याचीच शिक्षा करायला हवी, अशी ब्रिटनमध्ये कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !