Sukanta Majumdar On Murshidabad Violence : मुर्शिदाबादमध्ये दंगल करण्यासाठी मशिदीवरील भोंग्यांवरून करण्यात आली घोषणा !

केंद्रीय मंत्री आणि बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांचा दावा

बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार

कोलकाता (बंगाल) – मुर्शिदाबादमधील दंगलीची हाक मशिदीच्या भोंग्यावरून देण्यात आली होती, असा आरोप केंद्रीय मंत्री आणि बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी पीडितांचा संदर्भ देत केला. ‘जर राज्यात भाजप सत्तेत आला, तर अशा प्रकारच्या दंगलींसाठी कोणत्याही धार्मिक स्थळाचा वापर करण्यास बंदी घालण्यात येईल’, असे मजुमदार यांनी सांगितले. बंगालच्या पोलीस महासंचालकाची भेट घेतल्यानंतर मजुमदार पत्रकारांशी बोलत होते.

मुर्शिदाबादमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सक्रीय !

सुकांत मजुमदार यांनी दावा केला की, मुर्शिदाबादमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सक्रीय आहे. (या संघटनेवर बंदी असूनही ती गुप्तपणे कार्य करत आहे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक) या दंगलीच्या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही. मुर्शिदाबादमध्ये काय घडले ?, हे जगाला सांगण्यासाठी हिंसाचारातील पीडित हिंदु कोलकात्याला आले होते, अशी माहितीही मजुमदार यांनी दिली.

संपादकीय भूमिका

असे काश्मीरमध्येही होत होते. त्यामुळे देशातील प्रत्येक मशिदीवरील भोंगे काढून टाकण्याचा आदेश देण्याची आता आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्रातील सरकारने प्रयत्न केला पाहिजे !