
भुवनेश्वर (ओडिशा) – ऑस्ट्रेलियाचा मिशनरी असणारा पाद्री ग्रॅहम स्टेन्स आणि त्याच्या २ अल्पवयीन मुली यांच्या वर्ष १९९९ मध्ये करण्यात आलेल्या हत्यांच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले महेंद्र हेम्ब्रम यांची १६ एप्रिल या दिवशी ओडिशातील केओंझार कारागृहातून सुटका करण्यात आली. २५ वर्षे कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर ५१ वर्षीय हेम्ब्रम यांना ‘चांगल्या वर्तनाच्या’ आधारावर सोडण्यात आले. दारा सिंह यांच्यासह हेम्ब्रम यांना या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले होते. सुटकेनंतर हेम्ब्रम यांनी दावा केला की, धर्मांतर आणि गोहत्या यांना विरोध केल्यामुळे त्यांना या गुन्ह्यात अडकवण्यात आले. निर्दोष असूनही शिक्षा झाली.
Graham Staines Case: Mahendra Hembram, aide of Dara Singh, released after 25 yrs in jail.
Jail authorities gave Hembram a cordial farewell, garlanding him as a mark of recognition for his good conduct during his prison term.
Convicted in the 1999 killing of Australian… pic.twitter.com/LbWzXM5uxt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 17, 2025
या प्रकरणातील मुख्य आरोपी दारा सिंह सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याने सर्वोच्च न्यायालयात मुदतपूर्व सुटकेसाठी अपील केले होते, ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने ९ मार्च या दिवशी ओडिशा सरकारला त्यावर निर्णय घेण्यास सांगितले. अधिकार्यांच्या मते दारा सिंह यांच्या सुटकेवर पुढील काही आठवड्यात निर्णय घेतला जाऊ शकतो.