हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चिंचवड (पुणे) येथे ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर व्याख्यान !

चिंचवड (जिल्हा पुणे), १६ एप्रिल (वार्ता.) – सध्या धर्मांध हिंदूंना, लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद, रेल्वे जिहाद, हलाल जिहाद अशा अनेक प्रकारे घेरत आहेत; पण हिंदू या सर्व प्रकारांपासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे ते धर्मांधांच्या जाळ्यात अडकून स्वतःचे अस्तित्व नष्ट करून घेत आहेत. यामध्ये ‘श्रद्धा वालकर’चे उदाहरण असेल, कुंभमेळ्याला जाणार्या रेल्वेगाड्यांवर झालेले आक्रमण असेल, अशी अनेक उदाहरणे आहेत; म्हणून हिंदूंनी वेळीच जागरूक होऊन याविषयी जनजागृती केली पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. ते वाल्हेकर वाडी येथील ‘स्कायवन’ सोसायटीमधील कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचा लाभ अनेक धर्मप्रेमींनी घेतला. या वेळी समितीचे श्री. नीलेश जोशी यांनी समितीच्या उपक्रमांची माहिती दिली. या वेळी ‘हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा’ही घेण्यात आली.


‘कुंभमेळ्याचे महत्त्व भारतीय प्रसारमाध्यमांपेक्षा विदेशातील नागरिकांना अधिक समजले आहे’, असे श्री. गोखले यांनी सांगितले, तसेच ‘धर्माचरण आणि त्याचे महत्त्व’ या विषयावरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.