तूरडाळीचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा ३० टक्क्यांपर्यंत अल्प येण्याची शक्यता !
अमरावती – अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला १० सहस्र ६२५ रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने आणि त्यापूर्वी झालेल्या दुष्काळामुळे तुरीच्या पिकाची मोठी हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा दर शेतकर्यांना दिलासा देणारा ठरणार आहे.
या वर्षी तूरडाळीचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा ३० टक्क्यांपर्यंत अल्प येण्याची शक्यता आहे. सध्या आफ्रिका आणि इतर देशांमधून तूरडाळ आयात केली जात आहे. तुरीचा पुरवठा आणि मागणी यात मोठा फरक असल्याने बाजारात तुरीचे दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या १२० रुपये किलो तूरडाळ १७० रुपये किलो झाली आहे.