प्रदूषणाचे कारक
आता जो दृश्य संकटकाळ दिसत आहे, तो वास्तविक संकटकाळ नसून ती निसर्गानेच आरंभलेली शुद्धीकरण प्रक्रिया आहे. निसर्ग त्याचे प्रदूषण स्वतःच दूर करील; त्याचे तडाखे मात्र मानवाला सोसावे लागतील. त्याशिवाय मानवाला स्वतःच्या आचार-विचारांत पालट करावाच लागेल. वृत्ती सुधारली की, सर्व स्तरांवर परिवर्तन घडते !