ढगाळ वातावरणामुळे विदर्भात तुरीचे पीक धोक्यात !

तुरीच्या पिकावर कीड

यवतमाळ, १ डिसेंबर (वार्ता.) – गेल्या सप्ताहात विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर कीड निर्माण झाली. तसेच फुले गळत आहेत. त्यामुळे तुरीचे पिक धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे.

या संदर्भात जिल्ह्यातील कीटक शास्त्रज्ञ आणि कृषी विभागातील अधिकारी यांनी तूर उत्पादक शेतकर्‍यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता शेंगा पोखरणार्‍या अळ्याची अंडी, तसेच अळीची पहिली अवस्था दिसून आली. या वेळी पिकावरील कीड व्यवस्थापनाविषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले.