संभाजीनगर – यंदाचा उन्हाळा नेहेमीपेक्षा कडक रहाणार आहे. पावसाळ्यात नैऋत्य मोसमी पाऊस सरासरी गाठण्याची शक्यता सध्याच्या स्थितीवरून वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागानुसार सध्या मान्सूनपूर्व हंगाम चालू असून या हंगामात २० मार्चपर्यंत देशात सरासरीपेक्षा ७० टक्के पाऊस अधिक झाला आहे. राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात सरासरीपेक्षा कमाल तापमान ०.५ ते १ अंश सेल्सिअसने अधिक राहील. त्यामुळे राज्यात यंदा उष्णतेच्या लाटांचे प्रमाण अधिक राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.