दिवाळी फटाक्यांविना साजरी होते, तर ईद प्राणी हत्येविना का नाही ? – कंगना राणावत, अभिनेत्री

कंगना राणावत, अभिनेत्री

मुंबई – दिवाळी फटाक्यांविना साजरी केली जाऊ शकते, तर ईद प्राण्यांच्या हत्येविना अन् ख्रिसमस झाडे कापल्याविना साजरा केला जाऊ शकत नाही का ?, असा प्रश्‍न अभिनेत्री कंगना राणावत यांनी उपस्थित केला आहे.

कंगना यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, चला, दिवाळी फटाकेमुक्त (फ्री), ख्रिसमस झाडांना कापल्याविना अन् ईद प्राण्यांची हत्या केल्याविना साजरी करूया. सर्व लिबरल्स मंडळी माझ्याशी सहमत आहेत का ?, जर नसतील, तर तुम्ही कोणत्या बाजूने आहात, हे स्पष्ट कळत आहे. स्वत:ला विचारा, तुमच्या खर्‍या इच्छा काय आहेत ?’