चिंचवड (पुणे) येथील प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर (चिंचवड) येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांद्वारे चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली.

उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी आणण्याची शिवसेनेच्या आमदारांची मागणी !

अवैधरित्या ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याच्या काळ्या धंद्यावर उत्तरप्रदेश राज्यात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी घातली आहे, तशीच बंदी महाराष्ट्र राज्यातही घालण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे नागपूर येथील विधानभवनात प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.

नामदेव महाराज दिंडीच्या मार्गातील खड्डे बुजवण्याच्या वारकर्‍यांनी केलेल्या मागणीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारकर्‍यांचा नाहक मृत्यू झाला आहे. अजून किती वारकरी दगवल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ?

संपादकीय : शिक्षणव्यवस्था पालटा !

आताच्या काळाचा विचार केल्यास पूर्णत: ‘गुरुकुल’ पद्धतीचा अवलंब करणे कठीण वाटत असले, तरी त्यातील जे आदर्श होते ते सर्व आताच्या शिक्षणपद्धतीत आणणे अत्यावश्यक आहे. आदर्श गुरुकुल शिक्षणपद्धतीचा अवलंब केल्यास देशाचा उत्कर्ष होण्यास वेळ लागणार नाही !

विरोधकांनी आत्मविश्वास गमावला आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधेला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

Shivaji Maharaj : शिवरायांच्या काळातील समुद्री सामर्थ्य आपल्याला परत मिळवायचे आहे ! – पंतप्रधान मोदी

एखाद्या देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचे असते, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत प्रथम जाणले. त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला. समुद्री शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. ‘समुद्रावर ज्याचे वर्चस्व तो सर्वशक्तीमान’ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले.

जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा दिला ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आहे. देशासाठी भाजपने केलेले काम आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नियोजन यांमुळे भाजपप्रणीत ‘एन्.डी.ए.’ला ३ राज्यांत विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे.

मराठी पाट्यांसाठी ५५ सहस्र १६ दुकानदारांना नोटिसा !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इंग्रजी नामफलकासमवेत मराठी नामफलक लावण्यासाठी महापालिकेने शहरातील ५५ सहस्र १६ दुकानदारांना नव्याने नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत.

Indian Navy Day 2023 : मालवण (सिंधुदुर्ग) येथे होणारा नौदल दिनाचा सोहळा महाराष्ट्रासाठी भूषणावह ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र

राजकोट येथे पुतळा उभारणी आणि नौदल दिनाचा कार्यक्रम यांची केवळ २ मासांत सिद्धता केली गेली. हे कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन !

कोकण विकास प्राधिकरणाची कार्यवाही लवकरच होईल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.