नागपूर, ६ डिसेंबर (वार्ता.) – राज्यांत झालेल्या पराभवामुळे मोदी पंतप्रधान होतील हे लक्षात आल्याने अवसान गळालेला आत्मविश्वास नसलेला विरोधी पक्ष आहे. विरोधकांचे अवसान गळले आहे. आत्मविश्वास गमावला आहे, विरोधी पक्षाच्या पत्रात बीनबुडाची सूत्रे आहेत, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधेला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह अन्य मंत्री उपस्थित होते.
एक अवसान गळालेला व आत्मविश्वास नसलेला विरोधी पक्ष; एकनाथ शिंदेंचे टीकास्त्रhttps://t.co/x5dFyle2Vh#Eknathshinde #maharashtrapolitics
— Lokshahi Marathi (@LokshahiMarathi) December 6, 2023
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, चहा पानावर बहिष्कार टाकण्याच्या पत्रावर २३ जणांची नावे आहेत. त्यातील केवळ ७ जणांच्या स्वाक्षरी आहेत. विदर्भाच्या विकासासाठी आम्ही कालबद्ध विकास करू. शेतकर्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू. आम्ही शेतकर्यांसाठी विविध योजना लागू केल्या. घरातून बाहेर न पडणार्यांना शेतकर्यांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार काय ? अवकाळी गारपीट यात पंचनामे करण्यास मागे पहाणार नाही. गुन्हे लपवणारे सरकार नाही. सत्याला सामोरे जाणारे आहे. खिचडीमध्ये आणि कोविडच्या काळात भ्रष्टाचार झाला. आम्ही सूडभावनेने काम करणार नाही. महाविकास आघाडीने अहंकाराने केंद्रसरकारकडून पैसे घेतले नाहीत. त्यांच्या अहंकारामुळे विकास थांबला. आम्ही लोकांसाठी काम करत आहोत. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण आम्ही देऊ.
राज्यात आर्थिक शिस्त काटेकोरपणे पाळली आहे ! – अजित पवार
विदर्भाचे प्रश्न सकारात्मक चर्चा करून सोडवू. पुरवणी मागण्या करू. समर्पक उत्तरे आणि सकारात्मक निर्णय घेऊ. अवकाळी आणि दुष्काळ ग्रस्त यांना योग्य न्याय देण्याचे काम होईल. अर्थव्यवस्था ३५ लाख कोटींवर गेली आहे. आर्थिक शिस्त महायुतीच्या सरकारने काटेकोर पणे पाळण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांना चहापानाऐवजी पानसुपारी द्यायला हवी. |
विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण करावे ! – फडणवीस
सरकारच्या विरोधी पक्षाच्या पत्रात विदर्भ-मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेख नाही. कंत्राटी भरतीच्या जीआर् शिंदे सरकारने रहित केलेला विरोधी पक्षांना त्याची माहिती नाही. आज अर्थव्यवस्था ३५ लाख कोटींची झाली आहे. सर्व राज्यांच्या तुलनेत ती संतुलित आहे. एन्सीआर्डीचा अहवालात प्रतीलोकसंख्या या आधारावर गुन्हे वाचले पाहिजेत, हे विरोधी पक्षांना माहीत नाही. त्यांनी आत्मपरिक्षण करावे. |