सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज अँड नॉटिकल इंजिनीयरिंग ट्रेनिंग (सिफनेट)ची शाखा रत्नागिरीत चालू करा

पश्‍चिम किनारपट्टीवरील चार राज्यांत मोठी किनारपट्टी असूनही येथे सिफनेटची एकही शाखा नाही. सिफनेटद्वारे नॉटिकल इंजिनीयरींग मधील ४ वर्षांच्या पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम शिकवले जातात. याचा लाभ येथील मासेमार, तसेच अनेक तरुणांना होऊ शकतो.

इयत्ता १२ वीच्या ‘गणित’ विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही ! – महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ

या विषयाची प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्याचे राज्यात कुठेही आढळून आलेले नाही. याविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत. त्यामुळे ‘गणित’ या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही.

केवळ ४ शैक्षणिक संस्थांवर गुन्हे नोंद, वसुलीचे काम चालूच !

केंद्रशासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या शिष्यवृत्ती लाटून १ सहस्र ८२६ कोटी रुपयांचा घोटाळा वर्ष २०१७ मध्ये उघड झाला. याच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथक नियुक्त करण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे ४ सहस्र ५०० हून अधिक अंगणवाड्या बंद !

जनतेला संप करावा न लागता त्यांच्या अडचणी सोडवण्याची मानसिकता प्रशासनाने ठेवावी, असेच जनतेला वाटते !

परभणी येथे प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र विद्यार्थ्यांना पाठवणार्‍या ६ शिक्षकांना अटक !

कालिदास कुलकर्णी, बालाजी बुलबुले, गणेश जयतपाल, रमेश मारोती शिंदे, सिद्धार्थ सोनाळे आणि भास्कर तिरमले अशी अटक केलेल्या शिक्षकांची नावे आहेत. शिक्षकांनी प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढून ते व्हॉटस्ॲपवर अन्य विद्यार्थ्यांना पाठवले.

राष्ट्रवाद आणि अध्यात्मवाद भक्कम करणार्‍या पाठ्यक्रमामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल ! – योगऋषी रामदेवबाबा

भारताचा संपूर्ण जगात गौरव होईल, असे आत्मबळ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले पाहिजे. आपल्या आत्म्यामध्ये अनंत शक्ती आहे आणि ती शक्ती योगामुळे जागृत होत असते.

नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या शैक्षणिक शिष्‍यवृत्ती योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ !

नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या समाज विकास विभागाच्‍या वतीने विविध घटकांतील विद्यार्थ्‍यांसाठी शैक्षणिक शिष्‍यवृत्ती योजना घोषित करण्‍यात आली आहे.

राज्‍याबाहेरील विद्यापिठाची पदवी पदोन्‍नतीकरता ग्राह्य धरली जाणार नाही ! – शेखर सिंह, महापालिका आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड

या निर्णयामुळे बोगस पदवी आणि पदविका धारण करणारे अधिकारी अन् कर्मचारी यांना चाप बसणार आहे.

(म्हणे) ‘मंदिरांमध्ये महिला पुजार्‍यांना अनुमती दिली पाहिजे !’ – नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

मंत्रोच्चारांमुळे गाभार्‍यात पुष्कळ ऊर्जा निर्माण झालेली असते. त्यामुळे महिलांनी गाभार्‍यात प्रवेश केल्यास त्या ऊर्जेचा महिलांच्या जननेंद्रियांवर परिणाम होऊन त्यांना त्रास होऊ शकतो. यासाठी महिलांना गाभार्‍यात जाण्यास मनाई असते

गोव्यात ‘पी.एफ्.आय.’ मुसलमान विद्यार्थ्यांना भडकावत आहे !

‘पी.एफ्.आय.’वर बंदी असतांना तिचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने सक्रीय असल्याचे या घटनेवरून दिसून येते. गोवा सरकारने या प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन ‘पी.एफ्.आय.’वर कडक कारवाई करावी !