Goa New Education Policy : सरकार यंदापासून इयत्ता ९ वीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची शक्यता !

नवीन धोरणानुसार पहिली भाषा इंग्रजी, तसेच दुसरी आणि तिसरी भाषा ही भारतीय भाषा असणे सक्तीचे असेल. तसेच तिसरी भाषा म्हणून विदेशी भाषा घेण्याचा पर्याय ही आता असणार नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ‘स्वमग्न’ (गतीमंद) मुलांसाठी विशेष शाळा चालू होणार

‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास ५०० हून अधिक स्वमग्न विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर पाठवावे लागत होते; मात्र आता जिल्ह्यातच ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

पुणे येथे ‘नूतन मराठी विद्यालया’तील इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांस शिक्षिकेकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण !

असे शिक्षक विद्यार्थ्यांना कधीतरी घडवू शकतील का ? अशा शिक्षकांना बडतर्फ करून कठोर शिक्षा करायला हवी !

पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये २ विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’ !

विद्यार्थिनींची छळवणूक करणार्‍या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातूनच काढून टाकायला हवे ! तसेच त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करणे आवश्यक आहे !

नागपूर येथे एम्.बी.बी.एस्.चे ३५ टक्के विद्यार्थी अभ्यासामुळे तणावात !

तणाव-निर्मूलन करण्यासह नैतिक मूल्याचे शिक्षणही विद्यार्थ्यांना देणे आवश्यक ! त्यातून त्यांना आत्मबळ प्राप्त होईल !

शिक्षक स्थानांतर प्रकरणात आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली !

शिक्षकांचे केवळ स्थानांतर करून काय उपयोग ? दुसर्‍या शाळेत गेल्यावर ते त्याच चुका करत रहाणार ! स्थानांतरासमवेत त्यांना अन्य शिक्षा केली, तर त्यांना चुकीची जाणीव होईल.

IIT Bombay disrespecting Bhagwan RamSita : ‘आयआयटी बाँबे’च्या विद्यार्थ्यांकडून नाटकाद्वारे प्रभु श्रीराम आणि सीता यांचा अवमान !

उठसूठ कुणीही हिंदूंच्या देवतांची टिंगलटवाळी करतो आणि तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, हे १०० कोटी हिंदूंना लज्जास्पद ! अशा संस्थांमधून तयार होणारे ‘भावी अधिकारी’ कुठल्या मानसिकतेचे असतील ? हे वेगळे सांगायला नको !

शैक्षणिक शुल्क परत मिळावे, म्हणून पालकांचा चिंचवड (पुणे) पोलीस आयुक्तालयातील अधिकार्‍यांना घेराव !

पोलिसांनी टोलवाटोलवीची उत्तरे देणे म्हणजेच पीडित पालकांवर अजून अन्याय करण्यासारखे नाही का ?

Pondicherry Anti-Hindu Play : नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा नोंद

माता सीता आणि श्री हनुमान यांचा अवमान करणारे नाटक सादर केल्याचे प्रकरण : पोलिसांनी या नाटकाचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.

New Sainik Schools : नव्या सैनिक शाळा भाजप आणि रा.स्व. संघ यांच्याशी संबंधितांना चालवण्यास दिलेल्या नाहीत !

ऑनलाईन वृत्तसंकेतस्थळ ‘द रिपोर्ट्स कलेक्टिव्ह’ने म्हटले आहे की, केंद्र सरकारने ६२ टक्के नवीन सैनिक शाळांचे दायित्व संघ परिवार आणि भाजपचे नेते यांच्याशी संबंधित लोकांना दिले आहे.