नाशिक येथील लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर निलंबित !

सुनीता धनगर

नाशिक – येथील महापालिकेच्‍या वादग्रस्‍त शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्‍वीकारतांना अटक केल्‍यानंतर त्‍यांना १४ दिवसांची न्‍यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आली होती. त्‍यानंतर धनगर यांना सेवेतून निलंबित करण्‍यात आले आहे. तसे आदेश राज्‍याचे उपसचिव टि.वा. करपते यांनी काढले आहेत. शासन निर्णयानुसार पोलीस किंवा न्‍यायालयीन कोठडीत ४८ घंट्यांहून अधिक काळ राहिल्‍यास सरकारी सेवेतील व्‍यक्‍तींना निलंबित केले जाते. त्‍यानुसार लाचखोर सुनीता धनगर यांना निलंबित करण्‍यात आले आहे. (सुनीता धनगर भ्रष्‍टाचाराने कोट्यवधी रुपये कमावतात, हे माहीत असतांनाही त्‍यांचे पती, नातेवाईक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्‍याविषयी तक्रार न केल्‍याप्रकरणी या सर्वांनाही शिक्षा केली पाहिजे !  – संपादक)

संपादकीय भूमिका 

नोकरीला लागल्‍यापासून भ्रष्‍ट अधिकारी सुनीता धनगर यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपये भ्रष्‍टाचारातून मिळवले आहेत. त्‍यामुळे अशा भ्रष्‍ट अधिकार्‍यांना नुसते निलंबित न करता त्‍यांना बडतर्फ करून त्‍यांची संपूर्ण संपत्ती जप्‍त केली पाहिजे, तसेच त्‍यांचा भविष्‍य निर्वाह निधी आणि पूरक भत्ता शासकीय तिजोरीत जमा केला पाहिजे, असे जनतेला वाटते !