उष्णता वाढीमुळे गोव्यात आज शाळा बंद ठेवण्याचा शासनाचा आदेश

पणजी, ९ जून (वार्ता.) – गोवा राज्यात पावसाला झालेला विलंब आणि त्यासह झालेली उष्णता वाढ यांमुळे शासनाच्या शिक्षण खात्याने एका आदेशाद्वारे १० जून या दिवशी शाळा अन् उच्च माध्यमिक विद्यालये यांना सुट्टी घोषित केली आहे. सर्व शासकीय, शासन अनुदानित, खासगी, तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांच्या प्रमुखांनी या सुटीमुळे राहिलेला अभ्यासक्रम नंतर अधिकचे वर्ग घेऊन भरून काढावा, असे शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी कळवले आहे.

आज पूरक (सप्लीमेंटरी) परीक्षा होणार

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने जूनमध्ये होणारी पूरक परीक्षा ठरवल्याप्रमाणे १० जून या दिवशी होणार असल्याचे कळवले आहे. संबंधित उमेदवारांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी नियोजित वेळेत पोचावे, असे मंडळाने आवाहन केले आहे.

९ जूनला फोंड्यात पावसाच्या हलक्या सरी !

उन्हाचा दाह जाणवत असतांनाच ९ जूनला दिवसभरात फोंडा परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे काही काळ नागरिकांनी थोडा थंडावा अनुभवला.