कर्नाटकातील काँग्रेस सरकार शालेय पाठ्यपुस्तकातून रा.स्व. संघाचे संस्थापक हेडगेवार यांचा धडा हटवणार !

शिक्षणमंत्र्यांनी हेडगेवार यांना म्हटले ‘भ्याड’ !

बंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर रा.स्व. संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्यावर असलेला शालेय पाठ्यपुस्तकातील धडा काढण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. भाजप सरकारच्या काळात हा धडा अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्यात आला होता. निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने तिच्या घोषणापत्रात तो काढून टाकण्याचे आश्‍वासन दिले होते.

सौजन्य एचडबलू न्यूज इंग्रजी 

कर्नाटकचे शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा

१. कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी सांगितले की, शालेय पुस्तकांचा अभ्यासक्रम यावर्षीपासूनच पालटला जाणार आहे. राज्यात सरकार पालटण्यापूर्वीच शैक्षणिक वर्ष चालू झाले होते. त्यामुळे जुनी पुस्तके परत घेतली जाणार नाहीत, तर पूरक शाळांना काय शिकवायचे आणि काय वगळायचे याच्या सूचना देण्यात येणार आहेत. पुस्तकांमध्ये कोणते पालट करावे लागतील, याविषयी तांत्रिक समितीकडून अद्याप कोणत्याही शिफारसी प्राप्त झालेल्या नाहीत. समितीकडून आलेल्या शिफारसींवर मंत्रीमंडळ चर्चा करील. या प्रक्रियेला १० ते १५ दिवस लागतील. ती लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

२. दुसरीकडे काँग्रेसचे आमदार बी.के. हरिप्रसाद यांनी हेडगेवार यांना ‘भित्रा’ आणि ‘बनावट स्वातंत्र्यसैनिक’ म्हटले आहे. ते म्हणाले, ‘‘अशा लोकांविषयी मुलांना शिकवले जाऊ शकत नाही. कर्नाटकातील काँग्रेस सरकार हेडगेवार यांच्या जीवनाशी संबंधित प्रकरणांचा पुस्तकांमध्ये समावेश करू देणार नाही.’’ (ज्यांनी हिंदूंसाठी कार्य केले, त्यांचा अवमान करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही. असा पक्ष हिंदूंसाठी धोकादायक होय ! – संपादक)

३. यावर भाजपने सरकारवर इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप केला आहे. तसेच हेडगेवार यांना ‘भ्याड’ म्हटल्यावरून काँग्रेसने क्षमा मागावी, अशी मागणी केली आहे. ‘सरकारचा हा निर्णय तरुणांवर अन्याय करणारा आहे’, अस केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका 

यालाच म्हणतात काँग्रेसची सूडबुद्धी ! लाखो हिंदूंची हत्या, तसेच धर्मांतर करणार्‍या टिपू सुलतान याचा उदो उदो करणार्‍या काँग्रेसकडून याहून वेगळी अपेक्षाही करता येणार नाही !