६४ कोटी ३६ लाख रुपयांचे अमली पदार्थ नष्ट !

आतंकवादविरोधी पथकाने ४ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले (अंदाजे किंमत ६४ कोटी ३६ लाख रुपये )अमली पदार्थ नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी लि. येथील बंदिस्त भट्टीमध्ये जाळून नष्ट केले.  

नेपाळमध्ये चीनने उभारलेल्या विद्युत् प्रकल्पांमध्ये निर्माण केलेली वीज भारत खरेदी करणार नाही !

भारत आता जलविद्युत प्रकल्पांची संपूर्ण चौकशी करू पहात आहे. अशा परिस्थितीत आता चीनने निर्माण केलेली वीज नेपाळ भारताला विकू शकणार नाही.

पुण्‍यातील १ सहस्र ३८५ ग्रामपंचायतींमध्‍ये मोठ्या प्रमाणात निधी शिल्लक !

संमत निधीचा विकासकामांसाठी वापर होत नसेल, तर निधी का घेण्‍यात येत आहे ? यासाठी संबंधितांची चौकशी करून कारवाई करणे आवश्‍यक आहे.

अमेरिकेच्या डॉलरच्या बरोबरीनेच भारतीय रुपयाचाही वापर व्हावा !

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचे विधान !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार प्रदान

हा सन्मान मिळवणारे मोदी ठरले पहिले भारतीय पंतप्रधान !

गोवा : सरकारी कार्यालयांत रोखमुक्त (कॅशलेस) सेवा

आता सरकारी कार्यालयांमध्ये यापुढे देयके किंवा कोणतेही शुल्क यांसाठी रोखीने व्यवहार करावा लागणार नाही. महसूल खाते, वाहतूक विभाग आणि अन्य विभाग यांमध्ये आता सर्व प्रकारचे दाखले, दस्तऐवज, कर, शुल्क भरणे आदी रोखमुक्त व्यवहार करता येणार आहेत.

वर्तमान राजकीय परिस्थितीने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे संपूर्ण देशात हसे केले ! – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

जिल्ह्यातील नाणारचा प्रकल्प ५ दिवसांत बारसूला हालवला जातो. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला लागणारी जमीन ५ दिवसांत कुठून मिळाली? आज अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात लुटमार चालू आहे.

कोळसा खाण घोटाळ्यात माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा दोषी !

न्यायालयाकडून त्यांना १८ जुलै या दिवशी शिक्षा सुनावली जाणार आहे. विशेष न्यायालयाने त्यांना कलम १२० ब, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.

रत्नागिरी बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाविषयी मनसेने प्रशासनाला दिली निवेदनाद्वारे आंदोलनाची चेतावणी

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम हे मातीचे मोठे ढिगारे, खड्डे आणि उभारलेले काही खांब या पलीकडे गेलेले दिसत नाही.