डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील बंदी ट्विटरने उठवली !

जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराला उत्तरदायी ठरवून ट्विटरकडून ट्रम्प यांचे खाते कायमस्वरूपी बंद करण्यात आले होते.

अमेरिकी जनता सर्वांत भयावह कालखंडातून जात आहे ! – ट्रम्प

‘अमेरिकेला रशिया, चीन अथवा इराण यांच्याकडून धोका नसून डेमोक्रॅट्स पक्षाच्या कट्टर साम्यवादी धोरणांचा खरा धोका आहे. अमेरिकेला एकाच वेळी महागाईत वाढ आणि आर्थिक मंदी या भयानक चक्रातून जावे लागेल’, असेही ते येथे आयोजित एका कार्यक्रमात म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प पुतिन यांना घाबरत होते ! – ट्रम्प यांच्या माजी महिला सहकार्‍याचा दावा

ट्रम्प यांच्या माजी सहकारी स्टेफनी ग्रिशम या ट्रम्प यांच्या कार्यकाळात ‘व्हाईट हाऊस’च्या माध्यम सचिव होत्या.

अमेरिकेच्या लढाऊ विमानांवर चीनचे झेंडे लावून रशियावर बाँब टाका ! – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेने त्याच्या वायूदलाच्या एफ्-२२ या लढाऊ विमानांवर चीनचे झेंडे लावून रशियावर बाँब टाकावेत. यानंतर ‘चीनने हे केले’, असे सांगून आपण केवळ मागे बसून त्यांच्यातील भांडण पहात रहायचे, असे विधान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

माझ्या भीतीमुळे रशिया युक्रेनवर आक्रमण करू शकला नव्हता ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

माझ्या राजवटीतही पुतिन युक्रेनवर आक्रमण करण्याची सिद्धता करत होते; मात्र मी त्यांना रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बाँबस्फोट करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पुतिन गप्प बसले, असा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

पुतिन हे जो बायडेन यांना ढोलसारखे वाजवत आहेत ! – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीका

ट्रम्प पुढे म्हणाले की, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोटाळा झाला नसता, तर हे सगळे घडलेच नसते आणि मी जर पुन्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो, तर हे अजिबात घडले नसते.

अमेरिकेला ख्रिस्ती राष्ट्र करण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न !

‘पुरोगामी’ म्हणून ओळल्या जाणार्‍या अमेरिकेतही बहुसंख्य असणार्‍या ख्रिस्त्यांना त्यांचा देश ‘ख्रिस्ती राष्ट्र’ असावा’, असे वाटत असेल, तर बहुसंख्य हिंदूंना त्यांचा भारत ‘हिंदु राष्ट्र’ व्हावा, असे वाटल्यास चुकीचे ते काय ?

अमेरिकी गुप्तहेरांचा कोरोनाच्या उगमाच्या शोधाविषयीचा अहवाल राष्ट्राध्यक्षांना सादर !

अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाने कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला, याच्या केलेल्या पडताळणीचा अहवाल राष्ट्राध्यक्षांना सादर केला आहे. हा अहवाल पूर्ण नसून चीनच्या असहकार्यामुळे त्याचा उगम यात स्पष्ट करण्यात आलेला नाही.

अफगाणिस्तानातून अमेरिकेत आणलेल्या अफगाणी नागरिकांमध्ये सहस्रो आतंकवादी ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

‘भारतातही असेच झाले नाही ना ?’ हे भारतीय सुरक्षायंत्रणांनी पडताळून पहाणे आवश्यक !

‘विकिपिडीया’ संकेतस्थळावरील माहिती अविश्‍वासार्ह असून साम्यवादी विचारसरणीला पूरक !

साम्यवाद्यांनी ज्या ज्या क्षेत्रांत पाऊल ठेवले, त्या क्षेत्राची अपरिमित हानी केली, हा इतिहास आहे. साम्यवाद हा जगासाठी घातक आहे, हे लक्षात घेऊन तो हद्दपार करण्यासाठी आता जागतिक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक !