Keir Starmer On Ukraine : ब्रिटन आणि अमेरिका पूर्ण शक्तीनिशी युक्रेनला साहाय्य करतील ! – ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर

केयर स्टार्मर व डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टार्मर अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. परिषदेला संबोधित करतांना स्टार्मर रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध संपवण्याविषयी म्हणाले की, ब्रिटन अन् अमेरिका पूर्ण शक्तीनिशी युक्रेनला साहाय्य करतील. या वेळी ट्रम्प यांना प्रश्‍न विचारण्यात आला की, जर युक्रेनमध्ये ब्रिटीश सैन्य तैनात केले गेले, तर अमेरिका त्यांना साहाय्य करेल का ? त्याला उत्तर देतांना ट्रम्प म्हणाले की, ब्रिटनला साहाय्याची आवश्यकता असेल, तर अमेरिका ब्रिटनला पाठिंबा देईल. मग ट्रम्प स्टार्मर यांच्याकडे वळले आणि त्यांना विचारले, ‘तुम्ही एकटे रशियाशी लढू शकाल का ?’ स्टार्मर याला कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत आणि केवळ हसले.

१. ट्रम्प म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी चालू झालेली चर्चा आता बरीच पुढे गेली आहे.

२. स्टार्मर म्हणाले की, शांतता अशी गोष्ट असू शकत नाही, जी आक्रमकाला लाभ करून  देते किंवा इराणसारख्या राजवटीला प्रोत्साहन देते. इतिहास आक्रमकांच्या बाजूने नाही, तर शांतता प्रस्थापित करणार्‍यांच्या बाजूने असावा. शांतता राखण्याचा हा एकमेव मार्ग असल्याने ब्रिटन मित्र राष्ट्रांसमवेत जवळून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.