Pakistan Use Of ‘F-16’ Fighter Jet : पाकिस्तानला ‘एफ्-१६’ लढाऊ विमान भारताविरोधात वापरता येणार नाही !

अमेरिका ठेवणार ‘एफ्-१६ लढाऊ’ विमानांवर लक्ष

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या ‘एफ्-१६’ या लढाऊ विमानांवर आता अमेरिका लक्ष ठेवणार आहे. अमेरिकेने ही विमाने आतंकवादाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्तानला दिली होती; मात्र ही विमाने भारताच्या विरोधात वापरण्यात आल्याने, तसेच काश्मीर सीमेवर तैनात करण्यात आल्याने अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रम्प सरकारने मोठी आर्थिक तरतूद केली आहे.

वर्ष २०१९ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील आतंकवाद्यांच्या तळावर भारताच्या वायूदलाने केलेल्या आक्रमणानंतर पाकच्या वायूदलाने एफ्-१६ चा भारताच्या विरोधात वापर केला होता. भारताच्या ‘मिग-२१’ विमानाने हे विमान पाडले होते; मात्र पाकने ते नाकारले होते.